लाईट आली नसती तर तू वाचलाच नसतास..शंभूराज अधिकाऱ्यांवर कडाडले

Shambhuraj Desai : तुम्हाला प्रोटोकॉल कळतो का, असे देसाई म्हणाले.
Shambhuraj Desai Latest News
Shambhuraj Desai Latest News Sarkarnama

सातारा : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांनी पत्रकारांसमोरच अधिकाऱ्याला झापडले. तुम्हाला प्रोटोकॉल कळतो का? दुसरा कोण अधिकारी आहे, तुझ्या सोबत. लाईट आली नसती तर तू वाचलाच नसतास, असा दम त्यांनी भरला. यामुळे आज परिसरात दिवसभरापासून याचीच चर्चा सुरू होती. (Shambhuraj Desai Latest News)

Shambhuraj Desai Latest News
शंभुराज देसाईंनी सांगितले शिंदे सरकारचे वास्तव; राज्याच्या तिजोरीत पैसेच नाहीत

मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद घेण्यासाठी कराड येथील शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यापुर्वी काही मिनीटे अचानक तेथील वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे मंत्री देसाई संतापले. त्यांनी राज्य उत्पादन विभागाच्या एका अधिकाऱ्याला बोलावून घेऊन आत्ताच लाईट कशी गेली ?, अशी विचारणा केली. त्यावेळी, साहेब मला माहित नाही...मी नवीन आहे...,असे त्या अधिकाऱ्याने मंत्री देसाई यांना नम्रपणे सांगितले. मात्र संतापलेल्या मंत्री देसाई यांनी त्या अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.

Shambhuraj Desai Latest News
'मविआ' सरकारमध्ये मंत्री असुनही मला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता...

पुढे देसाई म्हणाले की, तुम्हाला प्रोटोकॉल कळतो का. दुसरा कोण अधिकारी आहे, तुझ्या सोबत. लाईट आली नसती तर तू वाचलाच नसतास, असा दम भरला. तसेच पीए व अधिकाऱ्यांनी त्याला समजून सांगा,मला असले चालत नाही असे सांगून त्यांनी पत्रकार परिषद सुरू केली. यामुळे याचीच चर्चा आज दिवसभर कराड मध्ये सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com