Uddhav Thackeray VS Eknath Shinde : राज्यातील सत्तासंघर्षानंतर ठाकरे गट (Shivsena Thackeray) आणि शिंदे गट हे समोरा-समोर आले आहेत. तर शिवसेना नेमकं कुणाची? यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगात आजपासून प्रत्यक्ष युक्तिवादाला सुरूवात झाली.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून शिवसेना आमचीच आहे असा दावा करण्यात आलाय. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना (Shiv Sena) आमचीच आहे, असा दावा केलाय. दोन्ही गटांनी धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.
धनुष्यबाण नेमकं कुणाचं याबाबत निवडणूक आयोगासमोर आज काही वेळ सुनावणी चालली. मात्र या संदर्भातील पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली असल्याचं ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी सांगितलं.
देसाई म्हणाले, ''धनुष्यबाण या चिन्हासह अजून काही मुद्द्यावर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. आज काही महत्वाच्या मुद्द्यांवर युक्तिवाद होऊ शकला नाही. आज फक्त ५ ते ७ मिनिटं कामकाज चाललं. आमच्यावतीने काही कागदपत्र सादर करण्यात आले. आज दोन्ही बाजूच्या कागदपत्रांची छाननी व्हायला पाहिजे होती. त्यानंतर दोन्ही बाजूच्यावतीने काय खरं काय खोटं? याबाबत तपासणी करायला पाहिजे होती. मात्र तसं झालं नाही, आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात याबाबतची पुढील सुनावणी होणार आहे,'' असं देसाई म्हणाले.
दरम्यान, आज निवडणूक आयोगासमोर (Election Commission) दोन्ही बाजूच्यावतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत शंका घेणारे काही अर्ज दाखल करण्यात आले. त्या मुद्यावरुन दोन्ही गटामध्ये जोरदार खडाजंगी झाली. यामुळे आज फक्त ५ ते ७ मिनिटं कामकाज चाललं. त्यानंतर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शंका घेणाऱ्या अर्जावर आधी सुनावणी होणार आहे. त्यानंतर मूळ प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.