MP Navneet Rana News : अमरावती (Amravati) लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा या नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत आली आहे.
राणा यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय १९ डिसेंबरला महत्वपूर्ण निकाल देणार आहे. त्यामुळे राणा यांची खासदारकी राहणार की जाणार? हे आता न्यायालयाच्या निर्णयानंतरच समोर येणार आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचा पराभव करून नवनीत राणा (Navneet Rana) अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा ठपका ठेवत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी या जात प्रमाणपत्र विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
आता राणा यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी मुंबई ( Mumbai) सत्र न्यायालय १९ डिसेंबरला निकाल देणार आहे. राणा यांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर सत्र न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
दरम्यान, राणा व त्यांच्या वडिलांच्या दोषमुक्ततेबाबत सत्र न्यायाधीश राहुल रोकडे हे निकाल देणार आहेत. याबाबतचा निकाल आज राखून ठेवण्यात आला आहे. राणा यांनी शिवडी कोर्टाच्या आदेशाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालय नेमकं काय निर्णय देणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. (Navneet Rana News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.