Shinde Gat Banner Sarkarnama
मुंबई

Thane Politics : अजितदादांच्या नेत्याला भावी आमदारकीच्या शुभेच्छा; शिंदे गटाने आव्हाडांना खिजवलं

Shinde Gat Banner Wishes Ajit Pawar Gat Leader In Thane : शिंदे गटाने बॅनर लावत जितेंद्र आव्हाडांवर साधला निशाणा...

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर -

आपला नेता भावी आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री व्हावे, असे सर्वसाधारण कार्यकर्त्यांना वाटते. मग त्यातून बॅनर्स लावून चर्चा घडवून आणली जाते. मात्र ठाणे शहरात अजितदादांच्या नेत्याला ( नजीब मुल्ला) चक्क शिवसेना शिंदे गटाने वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देताना डॅशिंग दमदार, भावी आमदार म्हटले आहे.

मुल्ला यांची कीर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ती सिमीत न राहता इतर पक्षातही दिसत आहे, यावरून स्पष्ट होते. तर दुसरीकडे मुल्लांना शुभेच्छा देताना, शिंदे गटाकडून एकप्रकारे जितेंद्र आव्हाडांना खिजवचण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाणे काय आणि पुणे काय राजकीय पक्षांमध्ये आपल्या लाडक्या नेत्याप्रति सर्वच कार्यकर्त्यांनी नेहमीच आदर असतो. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीमध्ये असताना शिंदे यांना त्यांच्या निकटवर्तींनी वागळे इस्टेटमध्ये भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लावून संबोधले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मध्यंतरी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावून संबोधले गेले होते. याशिवाय वाढदिवस असो किंवा नियुक्ती असो, असे काही झाल्यास शुभेच्छा देणारी प्रथा असल्याने तसे बॅनर लावले जातात.

पक्ष फुटीच्या राजकारणाने शिवसेना असो या राष्ट्रवादी यांच्यामध्ये दोन गट पडले आहेत. एके काळचे सहकारी आता राजकारणात वैरी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. ठाण्यात आमदार आव्हाड आणि माजी नगरसेवक मुल्ला हे गट सर्वांना परिचित आहेत. राष्ट्रवादी फुटीनंतर मुल्ला अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर मुल्लांनी कळवा आणि मुंब्रा येथे लक्षकेंद्रित करून आमदार जितेंद्र आव्हाड यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या मतदारसंघाला सुरुंग लावत काही कार्यकर्ते ही फोडण्यात यशस्वी ठरले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नजीब मुल्ला यांचा वाढदिवस असल्याने ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. त्यातील महापालिका मुख्यालयासमोरील बॅनर्स चर्चेचा विषय ठरला आहे. हा बॅनर्स राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावलेला नाही तर, तो शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेने लावला आहे. पण तो बॅनर्स लावत मुल्लांना डॅशिंग दमदार, भावी आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अजितदादांच्या नेत्याची ठाणे शहरात असलेली कीर्ती यावरून अधोरेखित होते. त्यामुळे आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT