Eknath Shinde - Ajit Pawar Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

Cabinet Meeting: आचारसंहितेपूर्वीच महायुती सरकारचा निर्णयांंचा धडाका; एकाच आठवड्यात विक्रमी तिसरी बैठक

Loksabha Election 2024 News : सह्याद्री अतिथीगृहावरील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले जातात, तसेच कुठल्या घोषणांचा पाऊस पडतो हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल काही तासांनी वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या (ता.16) दुपारी तीन वाजता पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेतच लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच निवडणूक आचारसंहितेची देखील घोषणा केली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने निर्णयांचा धडाका लावतानाच आठवड्यात तिसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) एकीकडे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सीएए कायदा, पेट्रोल-डिझेलच्या किमतीतील कपात यांसारखे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे.अशातच आता आचारसंहिता लागू होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच आता राज्यात देखील महत्त्वाच्या प्रशासकीय निर्णय आणि आदेशांचा धडाका सुरु आहे.

विशेष म्हणजे शिंदे सरकारने एकाच आठवड्यात मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) विक्रमी तिसरी बैठक बोलावली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत तब्बल 27 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.त्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून (Shinde Fadnavis Pawar Government) मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबरोबरच वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्यास मान्यता देण्यात आली होती.तसेच अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर, वेल्हे तालुक्याचे राजगड असे नामांतराचा महत्वपूर्ण निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 11 मार्चला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने 18 महत्त्वाचे निर्णय घेतले होते.त्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये राज्य सरकारने आणखी 27 महत्त्वाचे निर्णय घेत आपल्या निर्णयांचा धडाका कायम ठेवला होता.यातच आता पुन्हा एकदा शनिवारी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सह्याद्री अतिथीगृहावरील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेतले जातात, तसेच कुठल्या घोषणांचा पाऊस पडतो हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होत असलेली ही बैठक महत्वाची मानली जात आहे.त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT