Shinde-Fadnavis-Pawar Government: बळीराजासाठी खूष खबर! राज्य सरकारचे दिवाळीआधीच आणखी एक 'गिफ्ट'

NAMO Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे दोन हजारांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये लवकरच जमा होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत.

आता एप्रिल ते जुलै 2023 कालावधीसाठीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी तब्बल 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Cabinet Meeting Decisions: 'लेक लाडकी' होणार लखपती; राज्य सरकारचे सात मोठे निर्णय कोणते ?

केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. याच धर्तीवर राज्य सरकारदेखील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. आता या योजनेच्या पहिल्या हफ्त्याला मंजुरी देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीआधीच मोठं 'गिफ्ट' मिळणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन योजनेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Sasoon Drug Racket : 'ड्रग्ज रॅकेट' प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश; ललित पाटीलच्या भावाला वाराणसीमधून उचललं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com