Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News
Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

भाजप नेत्याच्या ट्विटमुळे दसरा मेळाव्याआधीच शिंदे गट अडचणीत...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यातून राज्यात सत्तांतरही झाले. शिवसेना (Shivsena) कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं हा प्रश्न निर्माण झाला असून हा याबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे.

मात्र, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आम्हीच खरी शिवसेना असा सामना रंगला असून दहीहंडी उत्सव ते दसरा मेळाव्यापर्यंत यांच्यात शर्यत लागलेली दिसत आहे. यामध्ये भाजप नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिंदे गटाला मोठ पाठबळ मिळालं आहे. (Eknath Shinde-Uddhav Thackeray Latest News)

दरम्यान, भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टीका करतांना व्यक्तीगत पातळीवर जाऊन ट्विटव्दारे ठाकरे कुटुंबियांवर जळजळीत टीका केली आहे. यामुळे शिवसेना आणि राणे यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. यामुळे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्या आधीच निलेश राणे यांच्या ट्विटमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

निलेश राणे यांनी केलेली टीका ठाकरे कुटुंबियावर व्यक्तीगत असल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यावर बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवणीने शिवसेना पुढे घेऊन जाण्यासाठी आपण हा बंड (त्यांच्या भाषेत उठाव) केलं असल्याचे सांगितले होते.

आपण किंवा आपल्या सोबत आलेले आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी कधीही ठाकरे कुटंबियावर व्यक्तीगत पातळीवर टीका करणार नाही,असे वारंवार सांगण्यातही आले होते, असे त्यांनी सुरूवातीला पाळलेदेखील आणि भाजप नेत्यांनाही ठाकरे कुटुंबियावर थेट टीका करण्यापासून त्यांनी रोखले होते. मात्र, कालांतराने शिंदे गटातील नेत्यांचा संयम सुटत चालला असून त्यांच्याकडून आणि भाजप नेत्यांकडून यामध्ये विशेषकरून राणे कुटुंबियाकडून कठोर भाषेत टीका केली जात आहे. यामुळे शिंदे गटाची कोंडी होत आहे.

आता निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊतांच्या टीकेला उत्तर देतांना ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले आहे. यामुळे यावर शिंदे गटाची काय भूमिका असेल, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. या आधी राणे कुटुंबिय आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये यामध्येही विशेष करून मंत्री दीपक केसरकर यांच्यात वादाचा कलगीतूरा रंगला होता. त्यावेळी केसरकरांनी याबाबतची तक्रार त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केली होती.आता निलेश यांनी पुन्हा केल्याल्या या टीकेचे शिंदे गटात आणि शिवसेनेमध्ये काय पडसाद उमटणार हे बघावं लागणार आहे. तसेच जवळ आलेल्या दसरा मेळाव्यावर याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो, अशी शक्यताही नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT