Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Dasara Melava 2023 : ‘दसरा मेळावा शिवतीर्थवरच...वाजत-गाजत गुलाल उधळत जायचंय’; शिवसेनेची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्यासाठीच्या मैदानावरून चालेल्या वादातून अखेर शिंदे गटाने माघार घेतली आहे.

Vijaykumar Dudhale

Thackeray Group Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठीच्या मैदानावरून चालेल्या वादातून अखेर शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावर शिवसेनेने ‘वाजत-गाजत गुलाल उधळत जायचंय… चलो शिवतीर्थवर’ अशी प्रतिकिया दिली आहे. (Shinde group withdraws from Shivaji Park dispute; Shiv Sena's first reaction)

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा आमने-सामने आले होते. मात्र, आमदार सदा सरवणकर यांनी शिंदे गटाचा अर्ज मागे घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. हिंदुत्वाचा विचार मांडण्यासाठी आम्हाला शिवाजी पार्क मैदान हवे होते. मात्र, आझाद मैदान किंवा क्रांती मैदानातून हा विचार मांडता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली, त्यामुळे आम्ही अर्ज मागे घेतला, असे आमदार सरवणकर यांनी सांगितले.

शिंदे गटाच्या माघारीनंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेच्या वतीने ट्विट करत आनंद व्यक्त करण्यात आला आहे. ‘दसरा मेळावा शिवतीर्थवरच… वाजत-गाजत गुलाल उधळत जायचंय..., साहेबांना दिलेलं वचन पूर्ण करायचंय...! चलो, शिवतीर्थ!’ असे आवाहन पक्षाकडून शिवसैनिकांना करण्यात आले आहे.

शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा ही शिवसेनेची ओळख आहे. ती परंपरा आपल्याला यंदाही जपायची आहे. त्यामुळे या वर्षी आपण शिवाजी पार्कवर म्हणजेच शिवतीर्थवर मेळावा घेणार आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वासुदेवांच्या शिष्टमंडळासमोर बोलताना सांगितले.

पूर्वी दिवसाची सुरुवात वासुदेव आल्यानंतर व्हायची. पूर्वी वासुदेव हे मुंबईतही यायचे, पण आता ही परंपरा राहिली काय आणि नाही राहिली काय, याच्याशी कोणालाही देणं-घेणं राहिलेलं नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी वासुदेवांच्या समस्यांवरही भाष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT