Eknath Shinde, Devendra fadnavis Sarkarnama
मुंबई

2024 CM Face Of Mahayuti: शिंदे की फडणवीस; कोण असेल पुढचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ?

Devendra Fadnavis And Mahayuti CM : देवेंद्र फडणवीस म्हणतात, "आदेश आले तर मी शिपाईसुद्धा बनण्यास तयार"

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde Or Devendra Fadnavis CM Face In 2024 : 'देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र' अशी घोषणा २०१४ मध्ये देण्यात आली होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले होते. मात्र हा 'फॉर्म्युला' २०१९ मध्ये अंमलात आला नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनले. दरम्यान, गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्याने सत्तांतर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. आता २०२४ ला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. (Latest Political News)

देवेंद्र फडणवीस एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. दरम्यान, सत्तांतरानंतर फडणवीस म्हणाले होते की मी सरकारमधील कुठल्याही पदावर राहणार नाही. मात्र ते उपमुख्यमंत्री बनले. याचा फडणवीस यांनी यावेळी खुलासा केला. ते म्हणाले, "मी पदाच्या लालसेपोटी राज्यात घडामोडी घडवून आणल्याचा आरोप होईल. त्यामुळे मला सरकारमध्ये पद नको असे म्हणालो होतो. मला पक्षकार्य करायचे होते. त्याची संधी द्यावी अशी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती. त्यास मान्यताही मिळाली होती. मात्र वरिष्ठ नेत्यांनी फेरविचार केला. हे युतीतील सराकर आहे. त्यामुळे कुणीतर अनुभवी सरकारमध्ये असणे गरजेचेचे आहे. त्यामुळे मला उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश दिले.

पक्षाचा आदेश माझ्यासाठी धक्काच असल्याची कबुलीही फडणवीस यांनी दिली. फडणवीस म्हणाले, "बैठकांमध्ये ठरल्याप्रमाणे मी पक्षकार्याचा विचार करत होतो. मात्र वरिष्ठाचे उपमुख्यमंत्री होण्यासाठी मला आदेश आला. तो माझ्यासाठी धक्काच होता. आदेश दिले तर मी शिपाई बनण्यासही तयार आहे. उपमुख्यमंत्री पद देऊन पक्षाने माझा सन्मानच केला. आता मागे वळून पाहताना वाटते की वरिष्ठांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. यामुळेच मी माझा पक्ष सांभाळू शकत आहे. काही अडचणी आल्यातर राज्यात माझ्या अनुभवाचा फायदा होत आहे."

राज्यात २०२४ मध्ये निवडणुका होत आहेत. त्यावेळी महायुतीकडून मुख्यमंत्री शिंदे की भाजपचे फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, "२०१४ मध्ये भाजपच्या आदेशाने मी मुख्यमंत्री झालो. आता पक्षाच्या आदेशानेच उपमुख्यमंत्री आहे. माझ्यासाठी पक्षाचा आदेश महत्वाचा आहे. हा प्रश्न तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना विचारायला हवा. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर बोलण्याचा अधिकार माझा नाही. तो पक्षाचा आहे. सध्या मी आहे त्या पदावरही खूश आहे. नेते कोण होणार आणि कोण नाही, याबाबत भाजपमध्ये वरिष्ठ नेते घेतात."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT