Devendra Fadnavis On Advertise : 'त्या' जाहिरातीवरून मुख्यमंत्री शिंदेंनी चूक मान्य केली; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political News : "आम्ही खुर्च्या तोडायला आलेलो नाही"
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde Accept Mistake Of Advertise : 'राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे' या अशायाची जाहिरात काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली. यावरून विरोधकांनीही राज्य सरकारवर टीका केली होती. या जाहिरातीबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चूक मान्य केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केले आहे. (Latest Political News)

देवेंद्र फडणवीस एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांना सरकारमधील मतभेदांबाबत छेडण्यात आले. या मतभेदांतूच शिंदे गटाकडून जाहिरात देऊन फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. त्यांनी दुसऱ्याच दिवशी सांगितले चुकीची जाहिरात प्रसिद्ध झाली. आमच्या लोकांनी चूक केली आहे."

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis On Morning Oath : पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या बैठकीनंतरच ! फडणवीसांचा खळबळजनक दावा

फडणवीस यांनी शिंदे गटातील आमदारांवरही यावेळी निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, "प्रत्येक पक्षात कमी बुद्धीचे लोक असतात. ते चुका करतात. तशीच चूक जाहिरातीची झाली. मात्र इतक्या छोट्या चुकीमुळे आमच्यात वाद वाढेल, आमचे सरकार कोसळेल असे अनेकांना वाटले. याकडे आमचे विरोधक लक्ष देऊनच होते. मात्र आम्ही खुर्च्या तोडायला आलेलो नाही. आम्ही मोठ्या विचारातून सरकार बनवले आहे. आमच्या सरकारचे ध्येय मोठे आहे."

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Chhattisgarh Politics : निवडणुकीच्या तोंडावर टी एस देव बनले उपमुख्यमंत्री; काँग्रसने नाराजी केली दूर? छत्तीसगडच्या घडामोडींना वेग...

यावेळी फडणवीस यांनी युतीच्या सरकारमधील शिंदे यांच्याशी असलेल्या 'बाँडिंग'बाबतही माहिती दिली. ते म्हणाले, "एकनाथ शिंदे आणि माझ्यात असलेला समन्वय अपवादात्मकच इतर कुठल्याही सरकारच्या काळात दिसला असले. मी मुख्यमंत्री असलेल्या शिंदे यांच्या कामात कधीही ढवळाढवळ करत नाही. तर शिंदे यांनी मी उपमुख्यमंत्री असल्याचे मला कधीही जाणवू दिले नाही. आम्ही दोघेही एकमेकांच्या सर्व मान मर्यांदांचे पालन करत असल्याचे राज्यात विकासाला गती मिळत आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com