Fadnavis on kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभेची जागा कोण लढविणार, श्रीकांत शिंदे की भाजप?; फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

कल्याण लोकसभेची जागा कोण लढविणार, हे आमच्या लोकांनाही माहिती आहे.
Devendra Fadnavis-Dr. Shrikant Shinde
Devendra Fadnavis-Dr. Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार संघर्ष बघायला मिळाला हेाता. ठाण्यातील (Thane) भाजपचे नेते आणि सरकारमधील कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला होता, तर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही इशारा दिला होता. मात्र, कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच भाष्य केले आहे. (Who will contest the Kalyan Lok Sabha seat : Fadnavis clearly said...)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, स्थानिक पातळीवर मतभेद होतात. पक्षाच्या कार्यकर्त्याना प्रोत्साहन दिले जाते. एका मेळाव्यात कार्यकर्त्यांनी कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघाची (Loksabha Election) मागणी केली होती, त्यावेळी स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा, यासाठी कल्याणची जागा आम्हीच जिंकणार असे उत्साहाच्या भरात सांगितले हेाते. मात्र, कल्याण लोकसभेची जागा श्रीकांत शिंदे हेच लढतील. हे आमच्या लोकांनाही माहिती आहे.

Devendra Fadnavis-Dr. Shrikant Shinde
Devendra Fadnavis On Morning Oath : पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या बैठकीनंतरच ! फडणवीसांचा खळबळजनक दावा

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजपकडून करण्यात आलेल्या मागणीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी, ‘कल्याणमधून लोकसभा निवडणुकीला कोणी दुसरं उभा राहत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे म्हटले होते. अशा गोष्टी सार्वजनिक व्यासपीठावर व्हायला नको होत्या. मात्र, ती एक छोटं मिस ॲडंरस्टिंग होतं, दुसरं काही नाही.

Devendra Fadnavis-Dr. Shrikant Shinde
Devendra Fadnavis On Advertise : 'त्या' जाहिरातीवरून मुख्यमंत्री शिंदेंनी चूक मान्य केली; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीवरून ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला हेाता. जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याची बदली होत नाही, तोपर्यंत शिंदे गटाला मदत द्यायची नाही, असे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच, कल्याणच्या जागेवरही दावा करण्यात आला होता. हा मतदारसंघ भाजपसाठी अनुकूल असून तो मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती.

Devendra Fadnavis-Dr. Shrikant Shinde
Mahadev Jankar : महादेव जानकरांना पुन्हा मंत्रिपदाची आशा; भाजपा काय करणार ?

भाजपने राज्यातील लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखही निवडले होते, त्यात कल्याणचाही समावेश होता. त्यात शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघही सामाविष्ट होते, त्यामुळे शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रया आली होती. मात्र, आता खुद्द फडणवीस यांनीच त्यावर भाष्य करत पडदा टाकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com