Sanjay Raut, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : लांडग्यानी वाघाचं कातडं पांघरलं तर तो वाघ होत नाही...

Sudesh Mitkar

Pune News : शिवसेनेचा वर्धापन दिन बुधवारी पार पडणार आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी यासाठी तयारी केली असून वर्धापन दिनवरून पुन्हा एकदा शिवसेनेचे हे गट आमनेसामने आले आहेत. या पार्श्ववभूमीवर ठाकरे गटांचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

पञकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 58 वर्षांपूर्वी  शिवसेनेचा पाया घातला. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना मुंबई, महाराष्ट्र, दिल्लीत काम करतेय, आम्ही तेव्हापासून तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून आम्ही भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला आहे. 

आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो, आमच्या अनेक जुन्या सहकाऱ्यांनी या पक्षासाठी बलिदान दिलं, आम्ही सर्वांनी तुरुंगवास भोगला पण आम्ही आमच्या पक्षाशी इमान कायम ठेवला. आता जर कोणी म्हणत असेल आमची शिवसेना खरी तर त्यांनी स्वतःला आरशात पाहावा असा टोला त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना लगावला. 

रवींद्र वायकर यांच्या बाबत बोलताना राऊत म्हणले, पैशाने मत विकत घेणं, विजयाची चोरी करण याला जनाधार म्हणत नाहीत. आपला पक्ष महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणंयाला जनाधार आणि विचारधारा म्हणत नाही. लांडग्यान वाघाचं कातड पांगरलं तर तो वाघ होत नाही, हिंदुरुदयसम्राटांची जी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचा नेतृत्व करत आहेत. 

जिथे ठाकरे तिथे शिवसेना, हे मधून शिंदे-मिंदे उपटले कुठून, हे जे उपटे आहेत यांना भाजपने आणलं, हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत. त्यांची ही कारस्थान आहेत. शिवसेना अशा प्रकारे फोडण हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठा आक्रमण आहे. मोघलांनंतर सर्वात मोठं आक्रमण मोदी शहा यांनी केल आहे. 

राज्यात पैशाच्या ताकदीवर पाच-सहा जागा जिंकल्या म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांचे होत नाही. आम्ही कोणाविषयी नकली शब्द करत नाही. असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तोच सर्वात मोठा पक्ष आहे. शिंदेंचा जे काही प्रकरण आहे ते काही दिवसांतच बंद होईल अशी टीका राऊत यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT