Shivsena bhavan, Mumbai  Sarkarnama
मुंबई

Shiv Sena Bhavan News : काय सांगता ! 'शिवसेना भवना'ला मोठं खिंडार ; पगारवाढ दिली नाही म्हणून चौघे कर्मचारी.. ; असं पहिल्यांदाच..

Shiv Sena Bhavan News : सातपैकी चौघांनी शिवसेना भवनातून काढता पाय घेतला आहे.

सरकारनमा ब्यूरो

Shiv Sena Bhavan News : राज्यातील सत्तासंघर्षात खासदार, आमदार, पदाधिकारी हे ठाकरे गटातून शिंदे गटात गेले आहेत. ठाकरे गटातील ही गळती थांबलेली दिसत नाही.

ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय कारणावरुन नाराज असलेल्या अनेक जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण अराजकीय कारणावरुन पहिल्यांदाच चार जणांनी उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'करीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेना भवनामध्ये काम करणाऱ्या चार जणांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंनी पगार वाढवला नाही म्हणून हे कर्मचारी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

शिवसेना भवनात काम करणार्‍या सातपैकी चौघांनी शिवसेना भवनातून काढता पाय घेतला आहे. ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

अमोल मटकर, अमित शिगवण यांच्यासह चौघांनी नो शिवसेना भवनातील नोकरी सोडली आहे. लोगो डिझाईनिंग आदी कलात्मक कामांसोबत सेनाभवनातील कॉल सेंटरमध्ये सातजणांचे पथक कार्यरत होते. कमी वेतनावर ते काम करीत होते.

पगार वाढ होत नाही, म्हणून यातील चार जण नाराज होते. या चौघा कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT