Shivsena News : शहरामधील शिवसेनेतील (शिंदे गट) अंतर्गत मतभेद रविवारी (ता. २) आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात उघडपणे समोर आले. अंबरनाथ पूर्व येथील पनवेलकर हॉलमध्ये आयोजित मेळाव्यात शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्वपक्षीय आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांवर थेट टीकेची झोड उठवत पक्षातील गटबाजी आणि नाराजीला वाचा फोडली.
सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडले की त्याला राजकीय रंग देऊन विरोधक ठरवले जाते, असे सांगत वाळेकर यांनी अंबरनाथ पश्चिमेतील हाउसिंग बोर्डाच्या १९२ कुटुंबांच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या १५ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून आतापर्यंत २० रहिवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी आमदार किणीकर यांच्यावर निशाणा साधला.
१५ वर्षांनंतर आवाज उठवणाऱ्या आमदारांचे मी स्वागतच करेन. पुढच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी या कुटुंबांना घरे मिळाली, तर मी स्वतः त्यांचा सत्कार करेन. पण नुसते फार्महाऊसवर बसून काय करता ? असा टोला त्यांनी लगावला. याचवेळी शहरातील बेकायदा होर्डिंजच्या प्रश्नावरूनही त्यांनी पक्षातील गटनेते आणि काही नगरसेवकांवर नाराजी व्यक्त केली.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी प्रतिक्रिया देत आरोप फेटाळत, हाउसिंग बोर्डाच्या १९२ कुटुंबांच्या पुनर्विकासासाठी मी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या विषयाची दखल घेतली असून प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी राज्य सरकार सकारात्मक पावले उचलत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.