Abhijit Dipke: ईडी, सीबीआय पाठवत असाल तर मोदींची डिग्रीही पाठवा! अभिजीत दीपकेंचे खुले आव्हान

Cockroach Janata Party News: सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषदेत ईडी, सीबीआय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीबाबत सरकारला खुले आव्हान दिले.
Abhijeet Dipke vs bjp
Abhijeet Dipke vs bjp Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : 'सरकारविरोधात बोललो, प्रश्न विचारले की ईडी आणि सीबीआय पाठवली जाते. माझ्याकडे ईडी पाठवत असाल तर पंतप्रधानांची पदवीही सोबत पाठवा. मी माझी पदवी, शिष्यवृत्ती आणि कर्जाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यास तयार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्रीही सार्वजनिक करण्यात यावी', अशी मागणी करत कॉक्रोज जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोमवारी पुन्हा सरकारला आव्हान दिले.

बुधवारी (ता.5) होणाऱ्या सीजेपीच्या प्रवक्ते आणि कोअर टीमच्या बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत दीपके यांनी केंद्र सरकारवर टीका करत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. पंतप्रधानांनी त्यांची शैक्षणिक पदवी सार्वजनिक केल्यास मीही माझी शैक्षणिक पात्रता आणि संबंधित सर्व कागदपत्रे जनतेसमोर ठेवण्यास तयार आहे.

सार्वजनिक पदावरील व्यक्तींच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती नागरिकांना मिळाली पाहिजे, असे दिपके म्हणाले. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद झाल्याचा दावा करत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांनी आंदोलनातून माघार घेऊ नये. कॉक्रोज जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून आवश्यक ती मदत करेल, असे दीपके यांनी आंदोलकांना आवाहन केले.

5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सीजेपीच्या देशव्यापी विस्ताराचा आराखडा, संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय रणनीती निश्चित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबत आरोप करतांना आज राजकीय पक्षांवर ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा दबाव आणला जातो. पक्ष फोडण्यासाठी या यंत्रणांचा वापर होत असल्याचे चित्र आहे.

Abhijeet Dipke vs bjp
MahaDBT 2.0 Scholarship: SC विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! प्री-मॅट्रिक व पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मतदान एका पक्षाला केले जाते, मात्र नंतर दुसऱ्याच पक्षाचे सरकार स्थापन होते. त्यामुळे पारंपरिक राजकारणाबद्दल जनतेमध्ये नाराजी वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ नवीन पक्ष स्थापन करून प्रश्न सुटणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी गरज पडल्यास आणखी जंतरमंतरवर जावून आंदोलन करण्याची आमची तयारी असल्याचेही दिपके यांनी सांगीतले.

Abhijeet Dipke vs bjp
KDMC Politics: महायुतीत पुन्हा धुसफूस? शिवसेना पदाधिकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत नवे राजकीय समीकरण

गुजरातमधील आरटीआय कार्यकर्त्याने अभिजीत दिपके यांच्या वडिलांना 60 हजार रुपये पगार असताना तो अमेरिकेत कसा शिकला? त्याचा खर्च कोणी केला? अशी माहिती विचारली आहे. या संदर्भात प्रश्न केला असता अभिजीत दीपके चांगलेच आक्रमक झाले. माझ्या वडीलांचा पगार विचारता, तसं मोदींची डिग्रीही दाखवा, असे खुले आव्हान दीपके यांनी दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com