Shiv Sena delegation meet President  Sarkarnama
मुंबई

Maratha, Dhangar Reservation शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट; मराठा, धनगर आरक्षणासाठी केली ‘ही’ मागणी

Shiv Sena Delegation Meet President : मराठा व धनगर समाजास आरक्षण देता येऊ शकते. त्यासाठी संविधानामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Vijaykumar Dudhale

New Delhi : मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राज्यात पेटला आहे. आरक्षणावरून दररोज आरोप-प्रत्यारोप आणि दोन समाजांमध्ये संघर्ष निर्माण होऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Shiv Sena delegation meet President regarding Maratha, Dhangar reservation)

महाराष्ट्रात जातीआधारीत आरक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. मराठा आणि धनगर समाज आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर मागासवर्गीयांबरोबरच वंचित समाजाच्या आरक्षणात कोणताही बदल न करता मराठा व धनगर समाजास आरक्षण देता येऊ शकते. त्यासाठी संविधानामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्तीचे आरक्षण देण्याचा अधिकार संविधानाने कोणत्याही राज्याला दिलेला नाही. पन्नास टक्क्यांचे वर आरक्षण द्यायचे असेल, तर त्यासाठी संसदेमध्ये कायदा करून देणे शक्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला न्याय देण्यासाठी संविधानामध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे एक विशेष अधिवेशन सत्राचे आयोजन करावे. तशी सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी शिवसेनेच्या निवेदनात करण्यात आलेली आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये खासदार सर्वश्री संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव, प्रियंका चर्तुवेदी, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तसेच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, माजी मंत्री अनिल परब, पक्ष प्रतोद सुनील प्रभू आदींचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT