Abhijit Patil Announced FRP : अभिजित पाटलांनी शरद पवारांसमोर दिलेला शब्द खरा केला; पण...

Solapur Sugarcane Price Issue : तुमचा आशीर्वाद असेल तर यापुढे आणखी एक धपका (चांगल ऊसदर) मी देतो, असे पाटील यांनी भाषणात म्हटले होते.
Abhijit Patil
Abhijit PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : टंचाईच्या परिस्थितीमुळे सोलापूरसह राज्यातील साखर कारखानदारांमध्ये ऊसदराची स्पर्धा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने २८०० रुपये दर जाहीर केला आहे. त्यानंतर अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ३००० रुपये दर जाहीर केला, अशा पोस्ट सोशल मीडियातून आज (ता. १८ नोव्हेंबर) सकाळपासून फिरत होत्या. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवारांसमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द अभिजित पाटील यांनी खरा केला. मात्र, त्यात पळवाट शोधली आहे. हा दर सरसकट जाहीर न करता टप्याटप्याने वाढवत नेला आहे. मात्र, उसाचे क्षेत्र पाहता ३००० हा दर शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरण्याची शक्यता आहे. (Abhijit Patil announced sugarcane price of Vitthal Sugar Factory)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज सायंकाळी २०२३-२४ या हंगामात गाळप होणाऱ्या उसाचा दर जाहीर केला आहे. त्यामध्ये पहिला हप्ता हा २८२५ रुपये जाहीर केला आहे. तसेच, नोव्हेंबर महिन्यात गाळप होणाऱ्या उसाला २८२५, डिसेंबरमध्ये गाळप होणाऱ्या उसाला २८५०, जानेवारी उसाचे गाळप झाले तर २९००, फेब्रुवारीमध्ये २९५० तर मार्चमध्ये गाळप होणाऱ्या उसाला ३००० रुपयांचा दर देण्याची घोषणा अभिजित पाटील यांनी केली आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhijit Patil
MLA London Tour : राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर; १२ आमदार निघाले लंडन दौऱ्यावर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दोन दिवसांपूर्वीच माढ्यातील कापसेवाडी येथे दौरा झाला. त्यात दौऱ्यात अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्यासमोर बोलताना आमच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात ऊसदाराची स्पर्धा लागल्याचे सांगितले होते. तुमचा आशीर्वाद असेल तर यापुढे आणखी एक धपका (चांगल ऊसदर) मी देतो, असे पाटील यांनी भाषणात म्हटले होते.

पवारांच्या त्या सभेनंतर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी उसाला २८०० रुपये दर जाहीर केला होता. त्यामुळे अभिजित पाटील यांना २८०० पेक्षा जास्त दर जाहीर करावा लागणार होता. तत्पूर्वी सकाळपासून सोशल मीडियात विठ्ठल कारखान्याचा ३००० रुपये दर जाहीर अशी पोस्ट फिरत होती, त्यामुळे अभिजित पाटील यांची कोंडी झाली होती. एकतर परिचारक यांच्यापेक्षा अधिकचा दर जाहीर करावा लागणार होता. या पोस्टमुळे तीन हजारपर्यंत दर जाईल अशी आशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली होती.

Abhijit Patil
Ram Shinde Advice to Son : ‘तू स्टेजवर (राजकारणात) यायची घाई करू नको’; व्यासपीठाकडे निघालेल्या मुलाला राम शिंदेंचा सल्ला

परिचारक आणि नेटिझन्सच्या धपक्यामुळे अभिजित पाटील यांना शरद पवार यांच्यासमोर बोललेला (सर्वाधिक ऊसदाराचा) शब्द खरा करावा लागणार होता. तो शब्दही अभिजित पाटील यांनी खरा करून दाखवला आहे. मात्र, ते करताना त्यांनी पळवाट शोधली आहे. प्रत्येक महिन्यात गाळप होणाऱ्या उसाचा भाव टप्प्याटप्याने त्यांनी वाढवत नेला आहे. नोव्हेंबर ते मार्च असा तो दर असणार आहे. मार्च महिन्यात गाळप होणाऱ्या उसाला सर्वाधिक तीन हजार रुपये भाव देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Abhijit Patil
Solapur Crime : दांडियाच्या कार्यक्रमाला बोलावून अभिनेत्रीशी केले असभ्य वर्तन; माजी नगरसेवक पुत्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

वास्तविक, सोलापूर जिल्ह्यात यंदा गाळप होणाऱ्या उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे उसाची उपलब्धताही कमी आहे, त्यातून ऊस पळवापळवी आणि ऊसदराची स्पर्धा लागणार आहे. पावसाळ्यात कमी पाऊस झालेला आहे. सोलापूर जिल्हा हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. उजनी धरणात यंदा जेमतेम पन्नास टक्के साठा झालेला आहे. त्यामुळे उसाला यंदा पाणी कमीच पडले आहे. उसाचे क्षेत्र घटलेले असल्यामुळे गाळप हंगामही लवकरच उरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च महिन्यात कारखाना किती चालेल आणि किती ऊस गाळप होईल, हा प्रश्नच आहे. त्यामुळे अत्यल्प शेतकऱ्यांनाच तो ३००० रुपयांचा दर मिळण्याची शक्यता आहे.

Abhijit Patil
Kolhapur News : तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com