जुई जाधव
Mumbai : शिवसेना, ठाकरे म्हटले की तुफान गर्दी, हे ठरलेलं समीकरण. त्यामुळे शिवसेनेची कुठलीही सभा असो ती मोकळ्या मैदानातच होते. नजर जाईल तिथं पर्यंत गर्दी असते. शिवसेनेत फूट पडली तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभेला होणार गर्दी मात्र काही कमी झाली नाही. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) बालेकिल्ला असणाऱ्या गिरगावात मात्र ठाकरेंच्या सभास्थळी वेगळेचं चित्र पाहण्यास मिळाले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आज (शनिवारी) गिरगाव येथे पार पडली. मात्र, मोठ्या मैदानावर सभा न घेता गिरगावातील बालाजी मंदिरा सामोर एका छोट्या गल्लीत ही सभा घेण्यात आली. मोठ्या सभांमधून आवाहन करण्यापेक्षा छोट्या गल्लीत सभा घेऊन सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधणाऱ्यावर ठाकरे भर देत असल्याचे दिसून आले
आदित्य ठाकरे आपल्या भाषणांमधून सरकारला धारेवर धरत आहेत. मुंबईतील विविध प्रश्नांवर जाब विचारत आहेत. शिवसेनेत फूट पाडली, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांत ताशेरे ओढत आहेत. राज्यातील विविध भागात जाऊन ते सभा घेत आहेत.गिरीगावाती सभेला शिवसनेचे नेते उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आदित्य ठाकरे हे येत्या 9 आणि 10 तारखेला कोल्हापूर दौरा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केला तेव्हा पासून आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत आणि प्रामुख्याने ज्यांनी बंड केला त्यांच्या मतदार संघात ते दौरे करत असून सभा घेत आहेत. 2024 च्या निवडणूकिसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कंबर कसली आहे. बैठका घेऊन सभा करत प्रचार ते करत आहेत. ठाकरेंच्या दौराचा फायदा निवडणुकीत होईल, असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.