Ram Mandir Ayodhya : आमदारांनंतर आता भाजपच्या मंत्र्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; एकनाथ शिंदे काय घेणार निर्णय?

Bjp Minister Writes Letter To CM Eknath Shinde : शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनंतर आता मंत्र्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र....
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव-

Maharashtra Politics Latest News : अयोध्येतील राम मंदिरचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. यासाठी 22 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

22 तारखेला पूर्ण देशात उत्सव साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी ही सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Ram Mandir Opening Ceremony प्राणप्रतिष्ठापना होत असताना सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. ही सकल हिंदू समाजाची मागणी आहे, असा उल्लेख या पत्रात केला गेला आहे.

Eknath Shinde
Ram Mandir Ayodhya : 22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मांसबंदी? भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आधी या भाजप आमदारांनी केली होती मागणी

22 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी या आधी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती. त्याचसोबत आमदार राम कदम यांनी 22 तारखेला मांसाहार आणि दारू विक्रीवर बंदी करण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या आधी केवळ आमदारांनी मागणी केली होती. मात्र आता थेट मंत्र्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीवर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

22 जानेवारीला राम मंदिराच भव्य महोत्सव होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राज्यातील मान्यवरांना आमंत्रण दिले गेले आहे. नागरिकांना याचा आनंद घरी बसून घेता यावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. भाजप तर्फे त्यादिवशी इतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करता यावा यासाठीची ही मागणी करण्यात आली आहे.

edited by sachin fulpagare

Eknath Shinde
Ram Mandir Opening : "22 जानेवारीला सुटी जाहीर करा" शिंदे गटाच्या नेत्यानंतर आता भाजप आमदाराचंही मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com