Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता है...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांमधील वाद टोकाला पोचला आहे. त्यामुळे दोन्हींही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) स्थापन होण्याआधीपासून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र, आता त्यांनी मौन पाळायचे ठरवले आहे. राऊतांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून कधी कधी मौन हे चांगले असते, असे ट्वीट केले आहे. राऊतांनी घेतलेल्या या मौनाच्या पवित्र्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीतील नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईंवरून शिवसेना नेत्यांना सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. त्यात मुंबई महापालिकेचे माजी स्थायी सभापती यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदीवरून राऊतांना माध्यमांनी प्रश्न विचारले होते. त्यावर राऊतांनी जैन डायरीचा उल्लेख करत उत्तर दिले. मात्र, आता राऊतांनी ट्विटवरून मौन महत्वाचे असल्याचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

राऊतांनी एका ओळीत ट्वीट केले आहे. राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं.. त्यांच्या या ट्वीटवर सोशल अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनीही राऊतांच्या ट्विटला उत्तर देत म्हणाले की, आता तुम्ही परिपक्व झालात. पाहून आनंद झाला सर, अशा प्रकारचे ट्वीट करत कंबोज यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. तर नेटकऱ्यांनाही राऊतांचे मौन आवडले दिसत नाही. तृप्ती गर्ग म्हणाल्या की, ट्विटर ला Instagram बनवु नका. राजेश नाव असलेले युजर्स म्हणतात 'तुमच्या प्रत्येक पोस्ट बरोबर स्व बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा धूसर होत चाललीये आणि तुमची व मालकांची जनमानसातील प्रतिमा प्रतिदिन मलिन होत चाललीये' तर संदिप शुक्लांनी "आमीन "आप ऐसे ही मौन रहे तो शिवसेना बच जाएगी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

डायऱ्यावरून बोलतांना राऊत म्हणाले होते की, देशाच्या राजकारणातील दोन किंवा तीन डायर्‍या आम्हालाही माहिती आहे. या डायऱ्यांमध्ये गुजरातपासून ते इतरांपर्यंत कोट्यवधी कोणाला मिळाले याच्या नोंदी होत्या. त्याचीही सीबीआय चौकशी झाली होती. मात्र, तेव्हा सीबीआयने अशा डायर्‍या विश्वास ठेवण्यायोग्य नसल्याचे सांगितले होते. तर डायरी हा पुरावा असू शकत नाही. तसेच, खोट्या डायर्‍या तयार केल्या जाऊ शकतात. भाजपच्या प्रेरणेने तपास यंत्रणा खोटे पुरावे, गुन्हे, खटले तयार करत असतील तर, कशावरून खोट्या डायर्‍या केल्या जाणार नाहीत, असा सवालही राऊतांनी उपस्थित केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT