तुरुंगातून सुटले की अनिल देशमुख पुन्हा पोलिसांचे सॅल्यूट घेणार!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) 'मनी लॅंड्रिंग'च्या आरोपाखाली सध्या जेलमध्ये आहेत.
Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) 'मनी लॅंड्रिंग'च्या आरोपाखाली सध्या जेलमध्ये आहेत. मात्र, अनिल देशमुख पुन्हा गृहमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन अमोल मिटकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. मिटकरी म्हणाले, देशमुख यांच्यावर भाजपकडून (BJP) कटकारस्थान करण्यात आले, हे सर्वांना माहीत आहे. चांदीवाल आयोगासमोर स्पष्टीकरण देताना माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस देशमुख यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही मिटकरी यांनी सांगितले.

Anil Deshmukh
सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?

भाजपने प्राप्तीकरांच्या किंवा ईडीच्या (ED) कोणत्याही धाडी टाकल्या तरी काहीही होणार नाही. देशमुख लवकरात लवकर बाहेर येतील आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील, असेही मिटकरी म्हणाले. तसेच ईडी पक्षप्रमुखांच्या घरांपर्यंत गेली. त्यामुळे ते भाजपसोबत जाणार असे नाही. आम्हाला भाजपची लायकी दाखवायची आहे. देशमुख पुन्हा गृहमंत्री होतील. दिलीप वळसे पाटील पण सिनिअर आहेत. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क खाते आहे, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.

Anil Deshmukh
दरेकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी टळली.. पण दोन आठवडे तरी त्यांना टेन्शन नाही..

भाजप पासून महाराष्ट्र वाचवायला हवा, हे पक्षप्रमुखांना माहित आहे. त्याच्यामुळे आमदार तानाजी सावंत यांना पक्षप्रमुख योग्य समजवतील. नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेऊ नये, अशा पक्षाच्या सूचना आहेत. त्यामुळे जी व्यक्ती निष्पाप आणि निष्कलंक आहे, ज्यांना फक्त राजकीय बळी ठरवण्याचे काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पूर्ण टीमने केले आहे. ते सर्व परत तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील, असेही मिटकरी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com