Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Shivsena : मंत्रिपद न मिळाल्याने शिंदेंचा शिलेदार नाराज? 'त्या' जाहिरातीत शिंदेंपेक्षा फडणवीसांचा फोटो मोठा अन् धनुष्यबाणही गायब

Shiv Sena internal disputes : शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिलेली भक्कम साथ पाहता शिंदेंनी त्यांना मागील सरकारमध्ये महत्त्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी दिली होती.

Jagdish Patil

Mumbai News, 23 Jan : माजी आरोग्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे सध्या पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरू होण्यास कारणीभूत ठरली आहे सावंत यांनी दिलेली एक जाहिरात. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त तानाजी सावंत यांनी एक जाहिरात दिली आहे.

या जाहिरातीतून चक्क शिवसेना (Shivsena) पक्षाचे चिन्ह असलेला धनुष्यबाण गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सावंत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिलेली भक्कम साथ पाहता शिंदेंनी त्यांना मागील सरकारमध्ये महत्त्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी दिली होती.

मात्र, ते सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांच्या काही वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा सध्याच्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही आणि त्यामुळेच तानाजी सांवत (Tanaji Sawant) हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. अशातच आता त्यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्यबाण गायब आहे.

इतकंच नव्हे तर शिवसेना (शिंदे गट) सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांता फोटो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा लहान लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, आज गुरूवारी (ता.23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबईत दोन्ही शिवसेनेचे मेळावे होणार आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा अंधेरीत तर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा मेळावा बीकेसीवर होणार आहे. दोन्ही मेळावे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होत असल्याने या मेळाव्यात दोन्हीकडील नेते नेमकं काय बोलणार? याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागल्या आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळालं तर ठाकरेसेनेला अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या.

त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे आता शिंदेंचं पारडं जड असल्याचं बोललं जात असतानाच आता माजी मंत्री आणि शिंदेंचे शिलेदार अशी ओळख असलेले तानाजी सावंत नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या चर्चांवर आता शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT