Vasant More : 'ठाकरे साहेबांसारखी गाडी घेतली अन तात्यांचा झाला लोच्या', तात्यांनी सांगितला तो आठवणीतला प्रसंग

Vasant More on Balasaheb Thackeray : पुण्याला भेट देत असत याच दरम्यान घडलेला किस्सा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे.
Vasant More on Balasaheb Thackeray :
Vasant More on Balasaheb Thackeray : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध नेत्यांकडून त्यांच्या समवेत घालवलेले काही क्षणांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये पुण्याबद्दल एक विशेष प्रेम होतं. पुणे हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्म स्थान होतं. त्यामुळे ते सातत्याने पुण्याला भेट देत असत याच दरम्यान घडलेला किस्सा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे.

Vasant More on Balasaheb Thackeray :
Ajit Pawar : सैफवर खरंच हल्ला झाला का? नितेश राणेंना संशय मात्र अजितदादांना खात्री, म्हणाले, "राणे कालच..."

वसंत मोरे म्हणाले , हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त २००२ साली पुण्यात माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग आजही जशाच्या तसा आठवतो..., त्याचे झाले असे त्यावेळी आमचा कात्रज भाग कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात होता आणि मी शिवसेना उपविभाग प्रमुख होतो, बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड क्रेझ माझ्या मनात होती आणि ती आजही तशीच आहे.

त्यामुळे कर्ज काढून हुबेहूब त्यांच्या गाडी सारखी दिसणारी लांबलचक सेकंड हॅन्ड टाटा ईस्टेट गाडी मी ही घेतली होती. याचदरम्यान साहेब पुण्यातील महर्षीनगर परिसरात त्यांच्या घरी येणार असल्याची माहिती आम्हाला कळाली आणि त्यांना पाहण्यासाठी कात्रज मधून मी बाळासाहेब खंदारे, शिवाजीराव शेलार, सुरेश पवार व शिवसैनिक साहेबांच्या भेटीसाठी निघालो..

Vasant More on Balasaheb Thackeray :
Pune Murder Case: धक्कादायक: पुणं हादरलं! कात्रीनं पत्नीचा खून करुन पतीनं केला व्हिडिओ व्हायरल

आमची गाडी लक्ष्मीनारायण चौकातून मातोश्रीनगरच्या दिशेने चालली होती आणि अचानक पाठीमागून साहेबांचा ताफा आमच्या गाडीमागे कधी आला आम्हाला समजलेच नाही...दारात गेलो आणि फटाक्यांची माळ वाजली आम्ही तर पुरते घाबरलो माळ संपली आणि भित भित गाडी पुढे घेतली तेवढ्यात घोषणा चालू झाल्या मग तर पुरतेच घाबरलो आणि पाहतो तर काय चक्क मागच्या गाडी मधून बाळासाहेब ठाकरे उतरत होते....साहेबांना पाहून संपूर्ण अंगावर काटाच आला होता त्यांचा वाढदिवस तीथून पुढे दरवर्षी साजरा होत गेला असं वसंत मोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com