Maharashtra Politics :
Maharashtra Politics : Sarkarnama
मुंबई

ShivSena Ex-MLA Audio Clip Viral: शिवसेनेच्या माजी आमदाराची शिक्षकाला शिवीगाळ; कथित ऑडिओ व्हायरल

सरकारनामा ब्युरो

Former MLA Tukaram Kate News: राज्यातील संत्तांतरापासून दररोज काहीना काही घटना घडत आहेत. आमदारांकडून जनतेला होणारी शिवीगाळ तर आता रोजचीच झाली आहे.काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक ऑडिओ समोर आला होता. त्यानंतर आता शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते यांचाही एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी शिक्षकाने फक्त पगार मागितला म्हणून शिवीगाळ केली आहे. त्यांच्या फोनवरील संभाषणाचा ऑडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. (Shiv Sena MLA abuses teacher; Alleged audio viral)

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम काते यांच्या संस्थेच्या शाळेतून हा प्रकार समोर आला आहे. काते यांच्या शाळेत कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकाला गेल्या काही महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.गेल्या २३ महिन्यांपासून संबंधित शिक्षक विनामोबदला शाळेत शिकवण्याचे काम करत आहे.आपला पगार मागण्यासाठी या शिक्षकाने काते यांना फोन केला होता. पण पगार देत नाही जा, पंतप्रधानांकडे तक्रार कर असं म्हणत कातेंनी संबधित शिक्षकाला शिवीगाळ केली.

ही कथित ऑडिओनुसार, काते यांच्या शाळेतील शिक्षक विनोद पोकळे आणि आमदार तुकाराम काते यांचा संवाद आहे. पोकळे हे तुकाराम कातेंना आपण त्यांच्या शाळेत गेल्या दोन वर्षांपासून इंग्रजी माध्यमात शिकवत असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला २३ महिन्ंयापासून पगार दिलेला नाही. शाळेतील शिक्षक नागेश यांनी पगार देणार नाही, तुला काय करायचं ते कर, असं म्हणाल्याचे पोकळेंनी आमदार कातेंना सांगितलं. पण त्याच वेळी पोकळे यांनी अनेक ठिकाणी पगार न मिळाल्याचा गाजावाजा केल्याने काते संतापले आणि त्या संतापाच्या भरातच त्यांनी पोकळेंना शिवीगाळ केली.

तु लोकांकडे जाऊन पगार दिला नाही असं सांगतो, तिकडच्या लोकांचे फोन आले मला, पगार देणार नाही पंतप्रधानांकडे तक्रार कर, अशा शब्दातं तुकाराम कातेंनी पोकळेंना धमकावल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर मला परत फोन केलास तर हात पाय तोडून हातात देईल, म्हणतं त्यांनी पोकळेंना शिवीगाळ केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT