Shivsena MLA Disqualification  Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; अध्यक्षांसमोरील सुनावणीत काय घडलं ?

Shivsena MLA Disqualification : शिंदे गटाला कागदपत्रं सादर करण्यासाठी आता 24 तारखेपर्यंत वेळ देण्यात आला

Ganesh Thombare

Mumbai Political News : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडत आहे. गेल्या सुनावणीवेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाला कागदपत्रं सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

यानंतर आजच्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून कागदपत्रं सादर करण्यात येणार होते. मात्र, ठाकरे गटाने कागदपत्रं सादर केले, तर शिंदे गटाने मात्र यासाठी आणखी वेळ मागितला आहे.

शिंदे गटाच्या मागणीनुसार त्यांना कागदपत्रं सादर करण्यासाठी आता 24 तारखेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. दोन्ही गटांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर त्या कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची‌ फेरसाक्ष घेण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी ती साक्ष वाचून दाखवली. ही साक्ष विधिमंडळाकडून टाइप करण्यात आली, तर ही साक्ष देताना त्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये, यासाठी विधिमंडळाकडून सुरू असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीनदेखील लावण्यात आली होती, तर सुनील प्रभू यांनी दिलेल्या साक्षीप्रमाणे संबंधित पुराव्यांची कागदपत्रे सादर करण्यात येत आहेत.

याबरोबरच शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तसेच तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहेत. तसेच दोन्ही गटांची बाजू नार्वेकर हे ऐकून घेणार आहेत.

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना दिलेला आहे. त्यामुळे सध्या नार्वेकर अॅक्शन मोडवर आले असून, दोन्ही गटांची बाजू ऐकल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर काय निर्णय देणार, याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT