Shiv Sena MLA Disqualification Case Sarkarnama
मुंबई

Sena MLA Disqualification Result : धाकधूक वाढली; पाहा निकालासाठी कोण-कोण आमदार उपस्थित राहणार?

Shiv sena MLA Disqualification News : आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काही वेळात लागणार असल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे...

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव-

Thackeray Group Vs Shinde Group :

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर काही काही तासांतच ऐतिहासिक निकाल लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शिंदेंच्या बाजूने की ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणार? याची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. हा ऐतिहासिक निकाल ऐकण्यासाठी दोन्ही बाजूचे कोण-कोण आमदार उपस्थित राहणार आहेत, हे जाणून घ्या...

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभाध्यक्ष Rahul Narwekar देणार आहेत. हा निकाल महत्त्वाचा आहे. संपूर्ण देशाचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे. या निकालासाठी दोन्ही गटाच्या वकिलांना उपस्थित राहण्यासाठीचा मेल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या निकालासाठी दोन्ही गटांचे वकील यांना उपस्थित राहणे तर अनिवार्य आहेच, त्याचसोबत दोन्ही पक्षांतील आमदारदेखील उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुनील प्रभू उपस्थित राहणार आहेत, कारण ते प्रतोद आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून भरत गोगावले, आमदार संजय शिरसाट उपस्थित राहणार आहेत. इतर नेत्यांना बाळासाहेब भवन इथे उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. त्यामुळे निश्चितच या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. विजय कोणाचा होणार, हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

विधानसभाध्यक्षांचा अधिकृत निर्णय आल्यानंतर आपल्यासमोर भाष्य करेन आणि आमची भूमिका मी सांगेन. मी इतकेच सांगतो, की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने दिली. धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला दिले आहे. विधानसभेत 67 टक्के बहुमत आमच्याकडे आहे, तर लोकसभेत 75 टक्के बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आम्ही जनतेच्या न्यायालयात काम करणारे लोक आहोत. हे सगळे लोकांच्या डोळ्यांदेखत घडते आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आता अपेक्षा आहे. न्यायमूर्ती म्हटल्यावर रामशास्त्री प्रभुणेंचे नाव आपल्यासमोर येते. त्यावेळी त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता निवाडा केला होती. आमची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. तसेच जनतेच्या न्यायालयातही आम्ही हा विषय मांडायचा आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश होते त्यात वेळकाढूपणा करण्यात आला, असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT