महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता निकाल कुणाच्या बाजूला लागणार! निकालापूर्वीच मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते करीत होते, तर काही वृत्तवाहिन्यांनी सूत्राच्या हवाल्याने एकनाथ शिंदेंच्या बाजूनं निकाल लागणार असल्याची ब्रेकिंग बातमीही दिली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shine) कुठे होते, असा प्रश्न सर्वांना पडला होता, तर याचं उत्तर आहे नांदेडजवळ. आज निकालाचं वाचन माहीत असूनही मुख्यमंत्री शिंदे नियोजित यवतमाळ आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर होते. निकालाचं वाचन सुरू झालं त्यावेळी त्यांची हिंगोलीतील बाळापूरमध्ये सभा सुरू होती.
निकालवाचन सुरू असतानाच त्यांची बाळापूरमधील सभा संपली. त्यानंतर ते मुंबईला परतण्यासाठी हिंगोलीहून नांदेडकडे रवाना झाले होते. या संपूर्ण दौऱ्यात मुख्यमंत्री निश्चिंत दिसत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्वांना उत्सुकता होती, की त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय करीत होते, तर उद्धव ठाकरे 'मातोश्री'वर होते आणि live निकाल पाहत होते. त्यांच्यासोबत कुटुंबीय आणि नेते होते. निकाल ऐकत असताना त्यांचा चेहरा पडला होता. संपूर्ण निकालानंतर मातोश्रीबाहेरही शांतता होती. त्यानंतर अगोदर जाहीर केल्यामुळे या निकालाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. निकालाचं वाचन सुरू असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पाटणमध्ये होते.
विशेष म्हणजे निकालवाचनाची वेळ सायंकाळी साडेचार दिली होती. त्यामुळे सर्वांचे डोळे निकालाकडे लागले होते. पण, विधानसभाध्यक्ष सव्वाचारच्या सुमारास विधिमंडळात आले. त्यानंतर त्यांनी अँटीचेंबरमध्ये कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. 5 वाजून 5 मिनिटांपर्यंत ते अँटीचेंबरमध्ये होते.
अँटीचेंबरमधून बाहेर पडल्यानंतर बरोबर 5 वाजून 12 मिनिटांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) निकालवाचनाला सुरुवात केली. त्यानंतर 6 वाजून 55 मिनिटांनी निकालवाचन संपलं. म्हणजे नार्वेकर यांनी तब्बल 103 मिनिटे निकालाचं वाचन केलं.
जसजसा निकाल लागत गेला तसतसा शिंदेच्या आमदारांचे चेहरे फुलत होते. शिंदे गटातील ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी होती ते सर्व आमदार पात्र ठरले आणि त्या सर्व आमदारांच्या मतदारसंघांत त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.