Yamini Jadhav Sarkarnama
मुंबई

Yamini Jadhav : मुंबई दक्षिणमधून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांची उमेदवारी निश्चित?

Mumbai South Loksabha constituency : सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर निर्णय झाल्याची माहिती.

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा झाला आहे, तर दुसरा टप्प्यातील निवडणुकीची तारीखही जवळ आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात जागावाटपाचा घोळ अजूनही पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत निर्णय बाकी आहे. मात्र, संभाव्य उमेदवारांचे नाव समोर येत आहे. अशाच प्रकारे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे नावही समोर आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांचे नाव निश्चित झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतरित्या पक्षाकडून घोषणा केली गेलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून अरविंद सावंत(Arvind Sawant) यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आता जर यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली, तर या मतदारसंघातही दोन शिवसैनिकांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतरच यामिनी जाधव(Yamini Jadhav) यांचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चित केल्याची माहिती आहे. मुंबईमधील काही मतदारसंघामध्ये महायुतीने अद्यापही उमेदवार जाहीर केलेले नाहीत, त्यापैकीच एक दक्षिण मुंबई मतदारसंघ आहे.

विशेष म्हणजे या मतदारसंघासाठी भाजपच्या राहुल नार्वेकरांनीसुद्धा तयारी सुरू केली होती. शिवाय भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचे दिसत असून, यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी मुंबई महापालिकेत नगरसेविकाही होत्या. मुंबई महापालिकेच्या बाजार उद्यान समितीच्या अध्यक्ष होत्या. विधिमंडळ शक्ती विधेयक समितीच्या सदस्या होत्या. 2019च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचा पराभव करून त्या विधानसभेत पोहाेचल्या होत्या. यानंतर पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पडल्यानंतर यामिनी जाधवांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून, एकनाथ शिंदेचे नेत़ृत्व स्वीकारले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT