Palghar Lok Sabha News : पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला, पण कोणत्या चिन्हावर लढणार?

Lok Sabha Election 2024 : उमेदवारी जाहीर होईल तेव्हा होईल; परंतु तोपर्यंत विरोधकांपेक्षा प्रचारात कुठेही कमी पडता कामा नये, यावर विद्यमान खासदारांनी भर दिला आहे.
Palghar Lok Sabha News :
Palghar Lok Sabha News :Sarkarnama
Published on
Updated on

Palghar News : पालघर लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप ठरले नसले, तरी उमेदवार मात्र राजेंद्र गावितच असतील,, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे गावित यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असून विरोधकांना तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याचे तसेच आक्रमकपणे प्रचार करण्याचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. (Latest Marathi News)

खासदार गावित यांनी आतापर्यंत मतदारसंघाच्या सर्व विभागाचा दौरा पूर्ण केला आहे. आताही गावोगावी बैठका, मेळावे ते घेत आहेत. महायुतीत हा मतदारसंघ कोणाला हे अद्याप ठरले नसले, तरी खासदार गावित हेच या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असतील. प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर ते निवडणुकीत उभे राहू शकतात. उमेदवारी जाहीर होईल तेव्हा होईल; परंतु तोपर्यंत विरोधकांपेक्षा प्रचारात कुठेही कमी पडता कामा नये, यावर गावितांनी भर दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Palghar Lok Sabha News :
Abu Azmi on the way to NCP : सपाला मुंबईत धक्का; अबू आझमी अजितदादांना ताकद देणार ?

पालघर लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha) महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जोरात प्रचार सुरू केला आहे. त्या वारंवार खासदार गावित यांच्यावर टीकेचे प्रहार करीत आहेत. अन्य कुणी त्यांना उत्तर देत नसले, तरी खासदार गावित त्यांनी मात्र त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. कामडी यांनी बोईसर येथील सभेत खासदार गावित यांनी पाच वर्षात एकही काम केले नसल्याची टीका केली होती.

Palghar Lok Sabha News :
Nashik Lok Sabha: अजितदादांचा सातारा मतदारसंघ घेऊन भाजपकडून नाशिकसाठी शिंदे गटाची कोंडी?

या टीकेला खासदार गावित त्यांनी तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर कामडी यांनी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना खासदार गावित यांनी लायकी नसलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करू नये, असा सल्ला दिला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com