Raj Thackeray, sharad pawar, rahul gandhi, uddhav thackeray  Sarkarnama
मुंबई

Thackeray brothers Alliance : ठाकरे बंधूंच्या 'मातोश्री'तील भेटीनंतर पहिल्यांदाच 5 महापालिकांची नावे उघड; ‘मविआ’ही शाबूत राहणार?

Shiv Sena and MNS Alliance in Upcoming Municipal Elections : मनसे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणार का, याबाबत उत्तर देताना राऊतांनी या प्रश्नाचे उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच देऊ शकतील, असे सांगितले.

Rajanand More

Sanjay Raut’s Statement on Uddhav Thackeray and Raj Thackeray Meeting : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत. रविवारीच दोन्ही बंधूंमध्ये मातोश्रीमध्ये राजकीय चर्चा झाली. प्रामुख्याने मुंबईसह राज्यातील पाच महापालिकांमध्ये दोन्ही पक्षांची युती करण्याबाबत एकमत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. नेमक्या कोणत्या महापालिकांमध्ये युती होऊ शकते, या प्रश्नावर राऊतांनी पाच महापालिकांच्या नावांचा उल्लेख केला. अर्थातच त्यामध्ये मुंबई महापालिका पहिल्या क्रमांकावर आहे. यांसह ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महापालिकांबाबत ठाकरे बंधूंमध्ये एकमत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाच प्रमुख महापालिकांमध्ये आपल्याला काम करावेच लागेल, याबाबत एकमत आहेत. याशिवाय अशा अनेक महापालिका आहेत, जिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागात मनसे आहे. त्यांची कुठे मदत घेता येईल? काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे. विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. या सगळ्याचा विचार पुढील निवडणुकांमध्ये करावा लागेल, असे सांगत राऊतांनी महाविकास आघाडी शाबूत राहणार असल्याचेही संकेत दिले आहेत.

मनसे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणार का, याबाबत उत्तर देताना राऊतांनी या प्रश्नाचे उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच देऊ शकतील, असे सांगितले. तसेच महाविकास आघाडी विधानसभेसाठी तयार झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळे गणित निर्माण करू. त्यात कोण कुठे असेल, याच अभ्यास करू, असे सांगत राऊतांनी काही महापालिकांमध्ये मविआ एकत्रित राहणार असल्याचे संकेत दिले.

महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. मनसे हा स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. तो स्वतंत्रपणे निवडणुका लढतो. सध्या आमची मनसेसोबत चर्चा सुरू आहे, असे सांगण्यासही राऊत विसरले नाहीत. मराठी अस्मितेसाठी लढणारे हे दोन पक्ष आहे. त्यामुळे मुंबईत महापौर ठाकरे बंधूंचाच होईल. ही युती ‘दिल और दिमाग से’ बनी युती आहे. ही केवळ राजकीय युती नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT