raju patil, Sanjay Raut, Bhausaheb Chaudhary
raju patil, Sanjay Raut, Bhausaheb Chaudhary sarkarnama
मुंबई

पक्ष गळतीकडे लक्ष द्या ; राऊतांवर टिका करणाऱ्या मनसे आमदाराला प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो

-शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला, याचं कारणही राज ठाकरे रविवारी होणाऱ्या पुण्यातील सभेत सांगणार आहेत. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) दौरा स्थगित केल्यावरून राजकारण तापले आहे.

सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत मनसेला टोला लगावला आहे. राऊत यांच्या टीकेला मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"पहिली गोष्ट म्हणजे दौरा रद्द झाला नाही आहे, तो पुढे ढकलण्यात आला आहे आणि आम्हाला यांची गरज नाही. त्यांना कदाचित दुःख वाटलं असेल, कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल. त्यांचं राजकीय हित साध्य झालं नसेल. आणि पुन्हा एकदा यांना सुपारी द्यावी लागेल. त्याचे दुःख वाटले असेल," असं सांगत राजू पाटील यांनी राऊतांना टोला लगावला. त्याला शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"प्रसिद्धीत राहण्यासाठी उठसुठ शिवसेना नेत्यांवर टिका करण्यापेक्षा आपल्या मतदार संघात पक्षाला लागलेल्या गळतीकडे लक्ष द्या," असा टोला भाऊसाहेब चौधरी यांनी आमदार पाटलांना लगावला आहे. यामुळे आता मनसे-शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर राजकारण पेटलं आहे.

राऊत यांनी भाजपा व मनसे अध्यक्ष राज यांच्यावर टिका करत भाजपाने राज यांच्या सोबत असे करायला नको हवे होते. अयोध्या येथील इतर राजकीय पक्षाचा कार्यक्रम रद्द झाल्याचे समजते त्यांना आम्ही मदत केली असती, तसेच आता तरी शहाणपण यावे अशी टीका त्यांनी राज यांच्यावर केली होती.

मनसे आमदार पाटील यांनी राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत त्यांना राजकारणातील सुपारीबाज म्हणत यांची सुपारी फुटली नसावी म्हणून त्यांना दुःख झाले असावे अशी बोचरी टिका शुक्रवारी केली होती. यावर आता भाऊसाहेब चौधरी यांनी आमदार पाटील यांना लक्ष केले आहे.

"ज्या मतदार संघाचे आपण प्रतिनिधित्व करता त्या मतदारसंघातील कार्यकर्ते आपला पक्ष सोडून जात आहेत. याचाही आपण विचार केला पाहिजे की आपल्या बरोबर असणारे कार्यकर्ते आपल्याला सोडून का जातात. पक्ष गळतीचा आधी विचार करा नंतरच आपण शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करा," असा सल्ला चौधरी यांनी पाटलांना दिला आहे.

चौधरी म्हणाले, "आमदार राजू पाटील हे सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर रोज उठून टिका करत आहेत. सेनेच्या नेत्यांवर काही तरी बोलायचे आणि प्रसिद्धीमध्ये रहायचे असे रोजचे त्यांचे राजकारण सुरू आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की साहेब राजकारणात राहताना समाजकारण देखील केले पाहिजे. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्यासाठी आपल्याला काही करता आले आहे. त्यांच्यासाठी आपण काही करत नाहीत आणि उठसूट शिवसेनेच्या नेत्यांवरती आरोप करून प्रसिद्धीत रहात आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT