मुंबई : शिवसेनेमधील (ShivSena) फुटीचे पडसाद आता दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील (Mumbai) मंडळांमध्ये उमटू लागले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मंडळांना आपल्या पंखाखाली घेण्यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे सध्या अनेक मंडळांमध्ये आपण नेमका कोणाचा झेंडा हाती घ्यावा? असा संभ्रम निर्माण झाला आहे. याच संभ्रमातून अनेक मंडळांमध्ये राजकीय फूट पडू लागली आहे.
मुंबईतील ९० टक्के उत्सव मंडळांवर आजही शिवसेनेचे वर्चस्व आहे. नगरसेवकांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंत अनेक जण मंडळांचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर आता ही समीकरणेही बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकांआधी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शनाचे जोरदार प्रयत्न हे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून सुरू झाले आहेत.
'दहीहंडी उत्सवापूर्वी आम्हाला टी शर्ट, गोविंदांच्या जेवणाचा, प्रवासाचा खर्च यासाठी राजकीय पक्षांकडे फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, यंदा दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या ऑफर्स मिळत आहेत. यामुळे मंडळांमध्ये कोणाची मदत स्वीकारावी आणि कोणाला नकार द्यावा, याविषयी संभ्रमाचे वातावरण असतानाच ठाण्यात देखील यंदाच्या वर्षी दहीकाला उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जाणार आहे. तसेच यंदाचा उत्सव हा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन उत्सव साजरा केला जाणार असल्याचे आयोजक पूर्वेस सरनाईक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.