यापुढे गद्दारांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल; माजी खासदाराचा थेट इशारा...

Hingoli|Shivsena|Subhash Wankhede : २०१४ मध्ये सुभाष वानखेडेंचा राजीव सातव यांच्याकडून अवघ्या दीड हजार मतांनी पराभव झाला होता.
Santosh Bangar, MP Hemant Patil & Subhash Wankhede Hingoli Latest News
Santosh Bangar, MP Hemant Patil & Subhash Wankhede Hingoli Latest News Sarkarnama
Published on
Updated on

Subhash Wankhede - शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागलेले असतांना यापुर्वी पक्षाला सोडून गेलेल्यांची घरवापसी सुरू झाली आहे. माजी खासदार आणि सध्या कॅाग्रेसमध्ये असलेले सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांनी काल मुंबईत शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत (Shivsena) शिवसेनेत प्रवेश केला. झालगेलं विसरून ठाकरे यांनी वानखेडेंच्या हाती पुन्हा शिवसेनेचा भगवा दिला आहे. (Hingoli)

वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला व आज (ता.21 जुलै) नांदेड येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना, वानखेडे यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांना गद्दार संबोधत गद्दार आमदार, खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा थेट इशारा दिला आहे. (MLA Santosh Bangar, MP Hemant Patil & Subhash Wankhede Hingoli Latest News)

Santosh Bangar, MP Hemant Patil & Subhash Wankhede Hingoli Latest News
अमित शहांनी अधिकाऱ्यांना पाठवले शरद पवारांकडे....

हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील आणि कळमनुरीचे आमदार आणि शिंदे गटाचे हिंगोली जिल्हाप्रमुख संतोष बागंर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले होते. (Marathwada) ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि पाटील, बांगरांना टक्कर देऊ शकेल अशा नेत्याची शिवसेनेला गरज होती. यामुळे वानखेडेंच्या घरवापसीमुळे हे शक्य होऊ शकेल, असे बोलले जाते.

वानखेडे यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते नांदेड येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन जवळ त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना त्यांच्या नेतृत्वात पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वानखेडेंनी बोलताना बंडखोरी केलेल्या आमदार, खासदारांना गद्दार असे संबोधले. वानखेडे म्हणाले, गद्दार आमदार, खासदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवला जाईल. तसेच, शिवसेना वाढीसाठी आम्ही यामपुढे गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Santosh Bangar, MP Hemant Patil & Subhash Wankhede Hingoli Latest News
शिवसेनेचा गटनेता लोकसभा अध्यक्षांनी परस्पर बदलला : विनायक राऊतांचा आरोप

सेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जुन्या शिलेदारांना आता एकत्र करण्याचे सत्र सुरू केल्याचे दिसत आहे. खासदार पाटील यांनी शिंदेंच्या गटात प्रवेश केल्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात त्यांचे पडसाद उमटत असतांना वानखेडेंना मातोश्रीवरून बोलावण्यात आले होते. नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी ठाकरेंशी चर्चा घडवून आणली होती, असे बोलले जात आहे. तर खासदार विनायक राऊत यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. सुभाष वानखेडे हे पुन्हा शिवसेनेत दाखल झाल्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेत होणारी मोठी होणारी फुट टाळता येईल असे बोलले जात आहे.

दरम्यान, वानखेडे हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांत पाटीलांचा पराभव करून हिंगोलीतून खासदार झाले होते. २०१४ मध्ये मात्र त्यांना कॅाग्रेसच्या राजीव सातव यांच्याकडून पराभव झाला होता. २०१९ मध्ये वानखेडे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत कॅाग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. पण शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्याआधी ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातून वानखेडेंनी ९५ ला पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. तर तीन टर्म त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. २०१४ मध्ये वानखेडेंचा राजीव सातव यांच्याकडून अवघ्या दीड हजार मतांनी पराभव झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com