शिंदे गटाकडे जाणाऱ्या शिवसेना नेत्यांची गाडी अडकली कुठे ?

आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पाडण्याची तयारी चालविली आहे.
Akola Shivsena Leaders on the way of Eknath Shinde group.
Akola Shivsena Leaders on the way of Eknath Shinde group.Sarkarnama
Published on
Updated on

अकोला : एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचा एक गट मुंबईला जाण्याचा तयारीत होता. मात्र, या गटातील एका माजी जिल्हा प्रमुखाने काढता पाय घेतला व आधी ‘मातोश्री’वर विचारणा करू व नंतरच निर्णय घेवू, अशी भूमिका घेतली. परिमाणी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत जाणाऱ्या या गटाची गाडी अकोल्यातून पुढे निघालीच नाही.

शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ५० आमदारांना साेबत घेत भाजपच्या (BJP) पाठिंब्याने राज्यात (Maharashtra) सरकार स्थापन केले. आता त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पाडण्याची तयारी चालविली आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील शिवसेनेपासून नाराज असलेला गट त्यांनी गळाला लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. या गळाला विधान परिषदेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया लागले. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील असंतुष्टांचा गट शिंदे यांच्या भेटीला जाणार होता. त्यासाठी मंगळवारी बाजोरिया यांच्या कार्यालयात बैठकही झाली.

या बैठकीला काही माजी जिल्हा परिषद सदस्यांसह सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, उपजिल्हा प्रमुख व काही माजी नगरसेवकांची उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख व माजी आमदार गाेपीकिशन बाजाेरीया-माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यातील दरी वाढत असल्याने देशमुख गटापासून दुरावलेल्या पदाधिकाऱ्यांना बाजोरीया गटाने जवळ करण्याचा प्रयत्न चालविला आहे. याचा फायदा घेत शिंदे गटाकडून जिल्ह्यात राजकीय पेरणी सुरू झाली. गुरुवारी शिंदे गटातील नेत्यांची भेट घ्यायची, असे नियाेजन झाले हाेते. मात्र, सध्या मुंबई दाैरा स्थगित झाला असून, लवकरच नव्याने नियाेजन हाेणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना फुटू नये ही तर भाजपची इच्छा!

जिल्ह्यातील भाजपचे वर्चस्व कायम रहावे, यासाठी भाजपच्या एका नेत्याने शिवसेना गटातील नेत्याशी भेटून चर्चा केली. शिवसेनेतील जास्त आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात गेल्यास भविष्यात मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटासाठी भाजपला त्याप्रमाणात जास्त जागा साेडाव्या लागतील. भाजप नेत्यांची राजकीय कारकिर्द, पक्ष वाढीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यात शिवसेनेमध्ये मोठी फुट पडू नये, ही भाजपची इच्छा असल्याची माहिती आहे. त्यासाठी भाजपचे एक पदाधिकारी सक्रिय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Akola Shivsena Leaders on the way of Eknath Shinde group.
ठाकरे गटात चिंतेचे वातावरण; CM एकनाथ शिंदे खासदार गजानन किर्तीकरांच्या भेटीला

आधीच चर्चा, मगच निर्णय!

शिंदे गटात सहभागी होण्यापूर्वी थेट चर्चा करावयाची असल्याचा आग्रह अकाेल्यातील शिवसेना गटातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडून किमान २० ते २२ टक्के जागा शिंदे गटासाठी सुटाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे थेट शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच मग निर्णय घेवू, अशी भूमिका बाजोरीया यांच्या सोबत जाणाऱ्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी घेतली असल्याची चर्चा आहे.

आधी मातोश्रीला प्राधान्य..

एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यापूर्वी आधी मातोश्रीवरील शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करू. तेथे समाधान झाले नाही तरच पुढचे पाऊल उचलू, अशी भूमिका शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखांनी घेतली असल्याचे माहिती आहे. सध्यातरी बाजोरिया गटाचा मुंबई दौरा लांबणीवर पडल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP leader Arun Lakhani after being elected unopposed from the Chandrapur-Wardha-Gadchiroli Local Authorities Constituency, with discussions focusing on Banti Bhangdia’s political strategy.
BJP
Model Code of Conduct
Viplav Bajoria
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com