Mumbai : शिवसेनेतील फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिलेल्या आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर वायकर यांना 17 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स देण्यात आले होते. त्यामुळे आजचा दिवस वायकर यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. ते चौकशीला उपस्थित राहणार की नाही,याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
रवींद्र वायकर (Ravindra Waikar ) यांनी जोगेश्वरी पूर्व येथील फाइव्ह स्टार हाॅटेलच्या बांधकामासाठी त्यापुर्वी झालेले करार लपविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. महापालिकेने या बांधकामाची परवानगी देखील रद्द केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नऊ जानेवारीला ईडीने (ED) वायकर यांच्या संबंधित भूखंड गैरवापर प्रकरणी सात ठिकाणी छापेमारी केली होती. वायकर यांनी हाॅटेलसाठी जो भूखंड मिळवला तसेच त्याच्यावर जे हाॅटेलचे बांधकाम सुरु केले ते तथ्थ लपवून केल्याचा ईडीचा आरोप होता. त्यामुळे वायकर यांना चौकशीसाठी ईडीकडून बोलवण्यात आले आहे.
ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना नोटीस दिल्यानंतर ही ते चौकशीला हजर राहिले नव्हते. केजरीवाल यांना तर तीन ते चार वेळा नोटीस पाठवण्यात आली आहे. दरवेळी काहीना काही कारण सांगून केजरीवाल चौकशी टाळत आहेत. त्या पार्श्वभुमीवर वायकर देखील ही चौकशी टाळणार का? याची चर्चा सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.