Lok Sabha Election 2024 : लोकसभा विजयासाठी भाजपचा 'मध्य प्रदेश फॉर्म्युला'; 'त्या' 165 जागांवर...

BJP Election News : मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर सर्व पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येईल.
BJP Political News
BJP Political News Sarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या वर्षी मध्य प्रदेशमध्ये भाजप विधानसभेत पराभूत होईल, असा अंदाज असताना भाजपने तेथे एकतर्फी विजय मिळवला. मध्य प्रदेशमध्ये विजयासाठी जो फॉर्म्युला वापरण्यात आला होता. तोच फॉर्म्युला भाजपकडून आता लोकसभेसाठी देशभर वापरण्यात येणार आहे.

BJP Political News
Shiv Sena MLA Disqualification : उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार? शिंदे गटाच्या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी

2023 मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आधीच्या 2019 विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या जागांवर लक्ष्य केंद्रित करण्यात आले होते. त्यासाठी निवडणुकीच्या दोन महिने आधीच पराभूत झालेल्या 164 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले होते.

त्याचा फायदा भाजपला झाला. आता तोच फॉर्म्युला लोकसभेसाठी वापरण्यात येणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ज्या 165 जागांवर पराभूत झाले. त्या जागांवर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पराभूत झालेल्या त्या 165 जागांवर आधीच उमेदवार जाहीर करण्याचा भाजपचा प्लॅन आहे. त्यासाठी 30 जानेवारीपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते. जर काही अडचणीमुळे यादी जाहीर होऊ शकली नाही, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यादीला अंतिम स्वरूप देण्यात येईल, अशी माहिती आहे. या पराभूत झालेल्या जागांच्या उमेदवारांच्या निवडी संदर्भातील 60 टक्के काम झाल्याची माहिती आहे.

साधारणपणे मार्च महिन्यात आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर सर्व पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. त्यामुळे प्रचाराला अवघा एक महिन्याचा कालावधी उमेदवारांना मिळेल. मात्र, भाजपच्या मध्य प्रदेश फॉर्म्युल्यामुळे त्यांच्या 165 जागांवरील उमेदवारांना दोन महिन्यांचा प्रचारासाठी कालावधी मिळेल. त्यामुळे उमेदवाराला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि उमेदवाराच्या विजयाची संधी वाढेल, अशी शक्यता आहे.

BJP Political News
Naya Yatra : प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधींकडून निमंत्रण, मात्र...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com