Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

शिवसेना - काँग्रेससोबत जाण्यास तयार मात्र राष्ट्रवादी नको : आंबेडकर भूमिकेवर ठाम!

Prakash Ambedkar : सकारात्मक प्रतिसाद आल्यास आघाडीबाबत आपण विचार करू, असे आंबेडकर म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या बाबतीत मोठी माहिती येत आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत त्यांनी आघाडीचा प्रस्ताव दिली असल्याचे समोर येत आहे. 'वंबआ' ठाकरे गट आणि काँग्रेससोबत (Congress) आघाडी करण्यासाठी तयार आहोत असे, त्यांनी विधान केले आहे. एकप्रकारे त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली आहे. मात्र यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला नाही.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला आघाडीचा तोंडी प्रस्ताव दिल्याचे समजते आहे. मात्र या आधीच त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, असे जाहीर केले होते. आजही त्यांनी राष्ट्रवादीचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. ते आपल्या या भूमिकेवर ठाम राहिले.

मात्र वंचितच्या या प्रस्तावावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. यावर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आल्यास आघाडीबाबत आपण विचार करू, असे आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला यांच्यावरही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे हे जसे भाजपला नको आहेत, तसेच आता एकनाथ शिंदे देखील त्यांना नकोच आहेत. परिस्थितीनुसार आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिंदेंसोबत निवडणुका लढवेल, असेह आंबेडकर म्हणाले.

राज्यात सुरू राजकीय वातावरणावरही त्यांनी भाष्य केले आहे. राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता, त्यांनी सर्वच पक्षांवर जोरदार टिका केली आहे. राज्यात ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, ते योग्य नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार हाच राजा असतो. तोच मतदार राजा ठरवेल की, कोणाला सत्तेत बसवायचं, असं आंबेडकर यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT