Shivsena News : शिवसेनेत उभी फूट पडल्यानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री बनले होते. पण सध्या महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यानं सहाजिकच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत. पण तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदासाठी आशावाद अजूनही कायम असल्याचं दिसून आलं आहे. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सहकारी मंत्र्यानं यासंदर्भात भाष्य केल्यानं हा विषय चर्चेला आला आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विधान केलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना पत्रकारांनी त्यांना त्यांच्या आधीच्या विधानाची आठवण करुन देत त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत विचारणा केली. त्यावर उत्तर देताना सरनाईक म्हणाले, जितेंद्र आव्हाड जर एवढे नाराज झाले असतील त्यांच्याकडं मंत्रीपद नाही म्हणून याची मला कल्पना नव्हती. पण त्यांनी विचार केला पाहिजे की कधी त्यांच्या मित्राला मंत्रीपद मिळालं कधी ते मंत्री होते. त्यामुळं त्यांनी नाराज होऊ चालणार नाही. त्यामुळं जर आमच्या पक्षात आले महायुतीत आले तर त्यांचंही भविष्य आम्ही उज्वल करु.
राज्यातल्या सर्वसामान्य शिवसैनिकाची प्रत्येकाची ही इच्छा असते की, आपल्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा. प्रतापराव जाधव असतील किंवा आमच्या पक्षाचे दुसरे नेते असतील त्यांचीही इच्छा आहे की, एकनाथ शिंदे हे मुख्यममंत्री व्हावेत, परंतू मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देत असताना महायुतीत काही निकष आहेत. ज्यांचं संख्याबळ जास्त आहे त्यांना मुख्यमंत्री देण्याची भूमिका आहे. तिच भूमिका पुढेही कायम राहील, आता पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला जास्त यश प्राप्त झालं, संख्याबळ वाढलं, आमचे आमदार वाढले तर निश्चितपणे आमचा मुख्यमंत्रीपदावर दावा राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.