Ganesh Naik Manda Mhatre row : 'बाहेरच्या लोकांची लुडबुड खपवून घेणार नाही'; मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना अप्रत्यक्ष टोला

Manda Mhatre Fires Indirect Warning in Palm Beach Dispute : पाम बीच मार्गावरील मॅरेथॉन आणि इतर कार्यक्रमांच्या परवानग्यांवरून निर्माण झालेल्या वादानंतर मंदा म्हात्रे आक्रमक; ‘माझ्या मतदारसंघात बाहेरच्या लोकांची लुडबुड खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा.
Ganesh Naik Manda Mhatre row
Ganesh Naik Manda Mhatre rowSarkarnama
Published on
Updated on

Palm Beach Road controversy : भाजप मंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील राजकीय वाद पुन्हा उफाळून आला आहे. भाजप मंत्री गणेश नाईक यांनी, पाम बीच मार्गावरील सर्व स्पर्धा रद्द करण्याचा तोंडी सूचना दिल्यात.

यावर मंदा म्हात्रे यांनी, माझ्या मतदारसंघात बाहेरच्या लोकांची लुडबुड अन् दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात मंत्री नाईक यांचे नाव न घेता प्रहार केला आहे.

16 ऑगस्टला पाम बीच मार्गावर आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला दिलेल्या सर्व परवानग्या तातडीने रद्द करण्याच्या सूचना भाजपचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिले होते. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या महिलेने स्वफायद्यासाठी दिलेल्या तोंडी तक्रारीवर मंत्री महोदयांनी करारी बाणा दाखवत पोलिस आणि महापालिका प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानंतर पोलिस आणि महापालिका प्रशासनाला तणावाखाली ही स्पर्धा पार पाडावी लागली.

याप्रकरणी क्रीडा क्षेत्रातील जेन-झीमध्ये प्रचंड असंतोष असतानाच आमदार म्हात्रे यांनी त्यांच्या बैठकीत स्वपक्षातील भाजप (BJP) नेत्यांचे नाव न घेता घरचा अहेर दिला. पाम बीचवर कार्यक्रम होत असल्यामुळे शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. परंतु काहींना पाम बीच मार्गावर जाहिरातींचे अनधिकृत होर्डिंग उभारून पैसा कमवायचा आहे. त्यांना अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे महत्त्व काय कळणार, असा टोला लगावला.

Ganesh Naik Manda Mhatre row
Congress Office Chair Theft Case : काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात चोरी, खुर्च्या चोरल्या; सीसीटीव्हीने बिंग फोडले

पाम बीच मार्गावर मॅरेथॉन आणि सर्व प्रकारचे कार्यक्रम होणारच, असे म्हणत माझ्या मतदारसंघात बाहेरच्या लोकांची लुडबुड खपवून घेतली जाणार नाही. महापालिकेला पाम बीच मार्ग सांभाळता येत नसेल, तर सिडकोला परत करा, असा हल्ला मंदा म्हात्रे यांनी चढवला. मंदा म्हात्रे यांनी शिष्टमंडळासह जाऊन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेत आज यासंदर्भात मागण्या मांडल्या.

Ganesh Naik Manda Mhatre row
Shiv Sena MP Notice : नोटीस मिळाली नाही म्हणता येणार नाही! शिवेसना ठाकरेंचे शिलेदार थेट बंडखोर खासदारांच्या घरी

‘एक खिडकी योजना’

आमदार मंदा म्हात्रे यांनी घेतलेल्या बैठकीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या विनासायास मिळाव्यात, यासाठी एक खिडकी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची सूचना करण्यात आली. याशिवाय सीबीडी-बेलापूर येथील महापालिकेच्या गाळ्यांसंदर्भात चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले.

नामकरणाचा प्रस्ताव

सानपाडा येथील सेंट्रल लायब्ररीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली. तसेच दिवाळे गाव येथील संगणक प्रशिक्षण केंद्र व ग्रंथालय इमारतीला माजी नगरसेवक (कै.) जगन्नाथ धर्मा कोळी यांचे नाव देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याचे सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com