Sanjay Raut On Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Devendra Fadnavis : मलिकांबाबत लिहिलेले राष्ट्रभक्तीचे 'डॉक्युमेंट' पाठवून देऊ का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis : मुंबई दौऱ्यात अजित पवार यांच्याबरोबर आमदार नवाब मलिक होते. यावरून शिवसेनेचे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांनी लिहिलेल्या पत्राची आठवण करून देत टीका केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार नवाब मलिक यांना समावून घेतले असून, त्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रप्रेम नकली असून, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नवाब मलिक यांच्याबाबत दिलेले राष्ट्रभक्तीचे 'डॉक्युमेंट', ऐतिहासिक पत्र मागे घ्यावे", असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार मुंबई दौऱ्यावर असताना आमदार नवाब मलिक त्यांच्याबरोबर होते. एकप्रकारे नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर संजय राऊत यांनी थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. आमदार नवाब मलिक यांना अटक करण्यापूर्वी ते सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलेत होते. पुराव्यानिशी बोलत होते. त्यामुळे त्यांच्या सुडबुद्धीने कारवाई झाली, असा आरोप करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार यांना लिहिलेल्या पत्राची आठवण करून दिली.

संजय राऊत म्हणाले, नवाब मलिक हे आता सरकारमध्ये असलेल्या पक्षाबरोबर आहेत. आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय भूमिका घेणार हे जाहीर करावे. देवेंद्र फडणवीस माघार घेणार का? नवाब मलिक यांच्यावर सर्व दाखल केलेले खटले हे सुडबुद्धीने दाखल केले होते, ते जाहीर करणार का? खोट्या प्रकरणात अडचणीत आणण्यासाठी ईडी, सीबीआय आणि एनआयई यंत्रणाचा दबाव निर्माण केला गेला की नाही, हे सांगणार का? अशा प्रश्नांचा भिडमार केला.

फडणवीस एक नबंरचे खोटारडे

देवेंद्र फडणवीस एक नंबरचे खोटारडे आहेत. ढोंगी आहेत. अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राची आठवण संजय राऊत यांनी करून दिली. नवाब मलिक जामिनावर आल्यानंतर ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांना राग आला आणि त्यांनी अजित पवारांना पत्र लिहिले, याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.

ते ऐतिहासिक डॉक्युमेंट

"देशद्रोहीला आपल्याबरोबर बसवू नका, दहशवाद्यांशी संबंध आहे, असे त्या पत्रात म्हटलो होते. देवेंद्र फडणवीस यांचे हे पत्र राष्ट्रभक्तीचे 'डॉक्युमेंट' आहे. ऐतिहासिक 'डॉक्युमेंट' आहे. ते मी जपून ठेवले आहे. वाटल्यात ते पत्र मी देवेंद्रजींकडे नसेल, तर ते आठवण म्हणून पाठवून देतो. आता नवाब मलिक सरकारमध्ये सहभागी झालेल्या पक्षात असल्याने देवेंद्र फडणवीस हे पत्र मागे घेणार का? नवाब मलिक यांच्यावर दाखल केलेले गुन्हे खोटे आहेत, जसे आमच्यावर खोटे गुन्हे नोंदवलेत, हे महाराष्ट्राला सांगण्याचे आव्हान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.

लाडक्या मलिकांनी शिंदेंच्या दाढीलाच आग लावली

आमदार नवाब मलिक यांच्या दाढीलाच आग लावली आहे. यांना काय तोंड आहे. लाडकी बहिणींबरोबर आता लाडके नवाब झाले आहेत. महायुतीला नवाब मलिकांचा चेहरा हवा आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT