Shiv Sena Thackeray vs Shinde : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष दिवसेंदिवस भाजप महायुती सरकारसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे नेते सक्रिय झाले असून, शाखा भेटी वाढवल्या आहेत. कार्यकर्त्यांची संघटनात्मक पातळी सुधारण्यावर भर देताना दिसत आहेत.
याचबरोबर भाजप महायुतीवर जोरदार हल्ला चढवत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री, नेते, आमदारांच्या वाढलेल्या अडचणीचा फायदा घेताना, भाजप-शिंदे शिवसेनेतील बेबनावर टायमिंग साधून टीका करत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी देखील सत्ताधारी भाजप हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत काय भूमिका घेत आहे, याबाबत खळबळजनक दावा केला.
माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, "गद्दारांची चिंता शिवसैनिकांनी करायची नाही, भाजपने (BJP) गद्दारांना तुरुंगात टाकण्याची तयारी सुरू केली आहे". त्यामुळे शिवसैनिकांनी निष्ठेने पक्षबांधणी केल्यास विजय नक्की होईल, असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी रविवारी भिवंडी शिवसेना मध्यवर्ती शाखा कार्यालयात महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित मार्गदर्शन सभा घेतली. उपनेते विश्वास थळे, अल्ताफ शेख, ज्योती ठाकरे, जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ तारे, सहसंपर्क प्रमुख सोन्या पाटील, तालुका प्रमुख कारसन ठाकरे, महिला शहर संघटक वैशाली मेस्त्री, महानगर प्रमुख अरुण पाटील, आशाताई रसाळ उपस्थित होते.
विनायक राऊत यांनी ‘राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेऊन राज्य सरकारने लोकशाहीचा मुडदा पाडला आहे. तीन वर्षे प्रशासक राजवटीच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे. सहा महिन्यांत निवडणुका घेतल्या नाही, तर सर्वोच्च न्यायालया यांना तुरुंगात टाकल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही', असा घणाघात केला.
'लाचारीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे सत्तेवर आहेत. गुंडांचे साम्राज्य वाढले आहे कारण गुंडांचे तारणहार राज्याच्या सत्तेवर बसले आहेत, एकनाथ शिंदे यांच्यावर आता गुवाहटी नव्हे, तर दिल्लीवारी करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस शिंदेंच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकल्या शिवाय शांत बसणार नाहीत. भाजपची गरज आता संपली आहे. सगळे भाड्याने घेतले त्यांची निष्ठा काय असणार, या गद्दारांच्या विसर्जनाची तयारी आता भाजपने सुरू केली आहे,’ असा खळबळजनक दावा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.