
BJP Mahayuti Liquor Tax Hike : मद्यावरील करवाढीविरोधात हॉटेलचालकांनी संपाची घोषणा केली आहे. या आजच्या राज्यव्यापी बंदमध्ये 11,500 हून अधिक हॉटेल, बार सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. या बंदला हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (एचआरएडब्ल्यूआय) पाठिंबा जाहीर केला आहे.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडियाच्या माहितीनुसार, पालघर, वसई, पुणे (Pune), नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लोणावळा, महाबळेश्वर आणि नाशिकसह राज्यातील प्रादेशिक हॉटेल असोसिएशनने हॉटेलमधील बार आणि अल्कोहोल सेवा बंद ठेवण्यास पूर्ण पाठिंबा दिला आहे.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष जिमी शॉ म्हणाले, "ही करवाढ हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी अस्तित्वाच्या धोक्यापेक्षा कमी नाही. अनेक आस्थापनांसाठी या तिहेरी आघातामुळे दुकान बंद करण्याशिवाय कोणता पर्याय नाही". मुंबई (Mumbai), पुणे, लोणावळा, अलिबाग, नाशिक आणि इतर प्रमुख ठिकाणी हॉटेलमधील रेस्टॉरंट्स आणि बार हे पर्यटन आणि व्यावसायिक आतिथ्य पायाभूत सुविधांचा कणा आहेत.
उत्पादन शुल्कात 60 टक्क्यांची मोठी वाढ, एफएल आउटलेटवर विकल्या जाणाऱ्या भारतीय बनावटीच्या परदेशी दारूवर 10 टक्के मूल्यवर्धित कर लादणे, चालू आर्थिक वर्षासाठी एफएल तीन परवाना शुल्कात 15 टक्क्यांनी वाढ करणे, या कारणांसाठी बंद पुकारण्यात आला आहे.
हा बंद म्हणजे आमचा ‘सामूहिक आक्रोश’ आहे. सरकारने हा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा आणि आर्थिक स्थैर्य, रोजगार आणि व्यवसायसुलभता यांचा विचार करून योग्य पावले उचलावीत, अशी मागणी आहे, असे ‘एचआरएडब्ल्यूआय’चे अध्यक्ष जिम्मी शॉ यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.