Shiv Sena UBT’s official candidate Ramchandra Mane joins Eknath Shinde-led Shiv Sena, marking a significant political shift. sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मतदान आठ दिवसांवर असताना उद्धव ठाकरेंना झटका, अधिकृत उमेदवाराचा थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Ramchandra Mane Joins Eknath Shinde Shiv Sena : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्जून पाटील हे प्रभाग क्रमांक 30 ड मधून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधातील ठाकरेंच्या उमेदवाराने ऐनवेळी पक्षाची फसवणूक केल्याची टीका करण्यात येत आहे.

Roshan More

KDMC Election : महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. मात्र, या प्रचार शिगेला जात असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला आहे.

जो उमेदवार मशाल चिन्हावर एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराच्या विरोधात लढत होता. त्याने बुधवारी माघार घेत आपला पाठींबा शिंदेंच्या उमेदवाराला जाहीर केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील या प्रकाराने ठाकरेंना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.

रामचंद्र माने असे पाठींबा देणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवाराचे नाव आहे. माने फक्त पाठींबा देऊन थांबले नाहीत तर त्यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला. . यापू्र्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचे तब्बल 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मानेंच्या जाण्याने महायुतीची ताकद आणखी वाढली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्जून पाटील हे प्रभाग क्रमांक 30 ड मधून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रामचंद्र माने लढत होते. मात्र मतदानाला केवळ आठ दिवस शिल्लक असताना त्यांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

शिंदेंचे सात उमेदवार बिनविरोध...

माने यांनी माघार घेतल्याने पाटील यांच्या विरोधात एकही उमेदवार नाही. त्यामुळे पाटील यांची निवड ही केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत बिनविरोध निवडणूक आलेल्या शिंदेंच्या नगरसेवकांची संख्या सात झाली आहे. तर, भाजपचे 14 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT