Shiv Sena News: पुण्यात प्रचारात राडा! शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या गाडीवर दगडफेक; महिला उमेदवार जखमी

Shiv Sena Pune City President Nana Bhangire News: शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक ४१ मधील शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार हे काळेपडळ परिसरातील मयूर जेएमएनएस सोसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास प्रचारासाठी गेले होते.
Pune Shiv Sena News
Pune Shiv Sena NewsSarkanama
Published on
Updated on

Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी धामधुम सुरु असताना धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली, तर प्रभाग क्रमांक ४१ मधील शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार यांच्यावर झालेल्या दगडफेकीत त्या किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धार वाढत असतानाच शिवसेनेच्या प्रचारादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक ४१ मधील शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार हे काळेपडळ परिसरातील मयूर जेएमएनएस सोसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास प्रचारासाठी गेले होते.

यावेळी अज्ञात व्यक्तींनी भानगिरे यांच्या वाहनावर अचानक दगडफेक केली. या घटनेत वाहनाचे नुकसान झाले. त्याच दरम्यान प्रचार करत असताना काही हल्लेखोरांनी उमेदवार सारिका पवार यांच्यावरही हल्ला केला, ज्यात त्यांच्या हाताला दगड लागल्यामुळे किरकोळ जखमी झाल्या.

Pune Shiv Sena News
Shivraj Patil Memorial: भाजप उभारणार काँग्रेसच्या दिग्गज दिवंगत नेत्याचे स्मारक; स्वतः CM फडणवीसांकडून घोषणा

घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येत आहे, असे शहराध्यक्ष भानगिरे यांनी सांगितले.

'पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनेची शहानिशा करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,' अशी माहिती काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com