Omraje Nimbalkar Sarkarnama
मुंबई

Shiv Sena news : मोठी बातमी : फुटीर चार खासदार मुंबईत, ओमराजे मात्र दिल्लीकडे रवाना; नेमकं काय घडलं?

Operation Tiger : ओमराजेंनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विकास आणि निधीसाठी आपण सत्तेतील शिवसेनेत जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Rajanand More

Om Rajenimbalkar news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा फुटीर खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून चार खासदार दिल्लीत असल्याची चर्चा होती. त्यानंतर सोमवारी हे खासदार मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी असल्याचे समजते. मात्र, दोन खासदार कुठे आहेत, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.

दिल्लीतून मुंबईला आलेल्या फुटीर खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. खासदार संजय दिना पाटील हे मुंबईतच त्यांच्या निवासस्थानी होते. तेही आता नंदनवन येथे दाखल झाले आहेत. तर ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे धाराशिवमधील त्यांच्या निवासस्थानी होते.

ओमराजे दिल्लीकडे रवाना

ओमराजे यांनी काही वेळापूर्वी सामच्या प्रतिनिशी बोलताना आपण दिल्लीला निघालो असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, मी आता सोलापूरहून दिल्लीला जाणार आहे. तिथून मुंबईला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू. आता बोलण्यापेक्षा आपण कृती करू.

दरम्यान, दिल्लीत जाऊन ओमराजे निंबाळकर हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते दिल्ली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतून ते थेट मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांचाही आजच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट आहे.

ओमराजेंनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विकास आणि निधीसाठी आपण सत्तेतील शिवसेनेत जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आष्टीकर यांनीही आपण विकासासाठी सत्तेत जाणार असल्याचे सांगितले आहे. अन्य चार खासदारांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे खासदार काय बोलणार, याबबात उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT