Uddhav Thackeray 1 Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray: शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' सुरु असताना ठाकरे अँक्शन मोडवर; डॅमेज कंट्रोल...

Operation Tiger Maharashtra politics: 'ऑपरेशन टायगर' सुरु असताना डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आगामी अधिवेशनात विरोधीपक्ष नेत्याने नाव जाहीर करण्यासाठी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Mangesh Mahale

Mumbai shiv sena news: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण सध्या जोरात सुरु आहे. राज्यात शिंदे गटाचे 'ऑपरेशन टायगर'सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळाबाहेब ठाकरे पक्षातील बडे नेते शिवसेनेच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही . आगामी निवडणूक तोडावर आली असताना माजी आमदार आणि पदाधिकारी हे ठाकरेंची साथ सोडत आहेत.

ठाकरे गटातील गळती थांबविण्यासाठी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता तातडीने पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक बोलवली आहे. येत्या 20 तारखेला खासदार, तर 25 तारखेला आमदारांची बैठक मुंबईतील शिवसेना भवनात होणार आहे.

'ऑपरेशन टायगर'सुरु असताना डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. आगामी अधिवेशनात विरोधीपक्ष नेत्याने नाव जाहीर करण्यासाठी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना खासदारांची बैठक घेतली होती. त्यानंतर मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.ठाकरे गटाकडे कोकणात भास्कर जाधव हे एकमेव आमदार आहेत.

भास्कर जाधव यांना त्यांच्या क्षमतेनुसार पक्षात संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. ते एकनाथ शिंदेंच्या गळाला लागतील, अशी चर्चा आहे. पण आपण ठाकरेंची साथ सोडणार नाही, हे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील 10 ते 12 माजी आमदार देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकताच केला आहे. येत्या काळात पक्षप्रवेश होतील, असे ठामपणे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT