Fadnavis on Thackeray Gandhi meet Sarkarnama
मुंबई

Fadnavis on Thackeray Gandhi meet : राहुल गांधीसोबत ठाकरेंची दिल्लीत डिनर डिप्लोमसी रंगणार; फडणवीसांनी करून दिली बाळासाहेबांच्या मार्गाची आठवण

BJP Devendra Fadnavis Criticizes Uddhav Thackeray Dinner with Rahul Gandhi in Delhi : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जात असून, तिथं काँग्रेस राहुल गांधी यांच्याबरोबर डिनर घेणार आहे.

Pradeep Pendhare

Delhi political dinner controversy : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सहा ऑगस्टपासून दिल्ली दौरा सुरू करत आहेत. ठाकरेंचा हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर ठाकरे डिनर घेणार आहेत.

परंतु दौरा सुरू होण्यापूर्वीच ठाकरेंवर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना सीएम फडणवीस यांनी हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गाची आठवण करून दिली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "मला वाटतं त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी. दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी. त्यानंतर लंच डिप्लोमसी करावी. कितीही डिप्लोमसी केली, परंतु जोपर्यंत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील, तोपर्यंत लोकं त्यांना मतदान करणार नाहीत".

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा सहा ऑगस्टपासून सुरू होत आहे. राज्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी राजकीय घडामोड असतानाच उद्धव ठाकरे दिल्ली (Delhi) दौरा करत आहेत. तिथं इंडिया महाविकास आघाडीच्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ठाकरेंचा हा दौरा चर्चेत आला आहे.

उद्धव ठाकरे सहा ऑगस्टला सायंकाळी दिल्लीत पोचतील. दुसऱ्या दिवशी इंडिया महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावतील. बैठकीनंतर ते राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला पोचतील. ठाकरेंना गांधींकडून डिनरचं विशेष आमंत्रण आहे. याचवेळी सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट होण्याची शक्यता आहे.

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसद भवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. त्यावेळी तिथं ते शिवसेना खासदार आणि दिल्लीतील राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

दरम्यान, ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांच्याबरोबर होत असलेल्या डिनर डिप्लोमसीवर फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. तसंच राहुल गांधी देशाविरोधात विधान करत आहेत. चीननं भारताची जमीन लाटली, असं विधान केलं होतं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारत सुधारण्याचा सल्ला दिला. त्यावर देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांधींना कोपरखळी लगावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT