Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार!

Shivsankalp Melava Thane uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. त्यामुळे ठाण्यात होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना असणार आहे.

Roshan More

Uddhav Thackeray News : शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. नुकताच पुण्यात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धन ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. या मेळाव्यानंतर शनिवारी (ता.10) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला ठाणे शहरात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

भगवा सप्ताहानिमित्त ठाकरे गटाचा भव्य मेळावा गडकरी रंगायतन येथे होणार उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे सामाना रंगला होता. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगले यश मिळाले. मात्र, आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचे सांगत शिंदे गटाने ठाकरे गटाला हिंदुत्वावादी मतांनी नाकारल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली. मात्र, ठाण्याची जागा शिंदे गटाने जिंकल्याने उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागले.

ठाकरे काय बोलणार?

उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी त्यांनी प्रदीर्घ चर्चा देखील केली. त्यामुळे ठाण्यात होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना असणार आहे. या मेळाव्याची तयारी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे व ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT