Rahul Narwekar sarkarnama
मुंबई

Shivsena 16 MLA Disqualification Case : निकालावर पहिली प्रतिक्रिया आली, ये तो...

MLA Disqualification Case : हा निकाल गृहीत असल्याचे सांगत जनता न्याय करेल असा, असा इशारा देखील आपल्या ट्विटमधून दिला आहे

Roshan More

Mumbai : विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेवरील निकालाचे वाचन करत असतानाच राष्ट्रवादीच्या आमदाराची पहिली प्रतिक्रिया आली आहे. नार्वेकर यांच्या निकाल वाचन सुरुवातीपासून शिंदे गटासाठी सकारात्मक होते. तर ठाकरेंच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे होते. उद्धव ठाकरेंनी 2018 मध्ये शिवसेनेच्या घटनेते केलेले बदल ग्राह्य धरण्यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिला. निकाल वाचन सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आपल्या भावानांना मोकळी वाट करून दिली.

'येह तो होना ही था ……#ठाकरे' असे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी हा निकाल गृहीत असल्याचे सांगत जनता न्याय करेल असा, असा इशारा देखील आपल्या ट्विटमधून दिला आहे. निकाल वाचणाच्या आधी देखील आव्हाड यांनी ट्विट करत नार्वेकर न्यायाच्या बाजुने निकाल देतील,अशी आशा व्यक्तक केली होती.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे शिंदे गटाविरोधात नेहमीच आक्रमक असतात. ठाण्यामध्ये आव्हाड विरुद्ध शिंदे असा वाद देखील आहे. त्यामुळे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून निकाल वाचन सुरू असताना न्यायाची अपेक्षा कोणाकडून करता, असे म्हणत आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकाला आधी देखील ट्विट

आव्हाड यांनी निकाल वाचनाच्या आधी देखील ट्विट केले होते. त्यामध्ये आजचा निर्णय केवळ दोन गटांचा नसून कोणते विषय पक्षांतर्गत आहेत? कोणते सभागृहाच्या,कायद्याच्या,तर कोणते निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेत येतात..? या बाबी स्पष्ट करणारा देखील असणार आहे, असे म्हटले होते. तसेच ज्याचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील भविष्यातील राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अग्रणी ठरलेल्या महाराष्ट्राला मिळालेली ही आणखीन एक ऐतिहासिक संधी आहे., याची आठवण आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून करून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT