Girish Mahajan Vs Jitendra Awhad : 'जितेंद्र आव्हाडांची 'DNA' टेस्ट करा' ; मंत्री गिरीश महाजनांची मागणी!

Maharashtra Politics : आव्हाडांनी श्रीरामांबाबत चुकीची मते व्यक्त करून आपलीच कुवत दाखवून दिली, असंही महाजन म्हणाले आहेत.
Girish Mahajan Vs Jitendra Awhad
Girish Mahajan Vs Jitendra AwhadSarakarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव -

Nashik News : 'जितेंद्र आव्हाडांचा तोल गेलला आहे. आपण काय बोलतो आहे याचे भानही त्यांना नाही, वास्तविक त्यांची डीएनए टेस्ट करावी.' अशी तिखट प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. नाशिक येथे आयोजीत राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या बोधवाक्य आणि बोधचिन्हाच्या अनावर प्रसंगी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

श्रीराम मासांहरी होते, असे मत प्रदर्शन केल्यापासून आव्हाड हिंदुत्ववादी संघटनांच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) महाजन यांनी सुद्धा आव्हाडांवर टीका केली. 'देशभरातील वातावरण राममय झाले आहे. असे असताना आव्हाडांनी श्रीरामांबाबत चुकीची मते व्यक्त करून आपलीच कुवत दाखवून दिली. वास्तवीक जितेंद्र आव्हाड यांची डीएनए टेस्ट व्हायला हवी.' असं ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Girish Mahajan Vs Jitendra Awhad
Devendra Fadnavis : 'जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ...' : देवेंद्र फडणवीसांचं विधान!

रोहित पवारांची चौकशी नियमानुसार

रोहित पवारांची(Rohit Pawar) आणि बारामती कंपनीची चौकशी नियमानुसार चालू आहे. ईडीची चौकशी अचानक उभी राहत नाही. त्याची प्रक्रिया आहे. सुरूवातीस चौकशी होते. त्याचे स्पष्टीकरण मागितले जाते. अनेक दिवसांच्या कागदोपत्री व प्रत्यक्ष चौकशीनंतर ईडीची पुढील प्रक्रिया सुरू होते. बारामती अ‍ॅग्रो कंपनीत अनियमीतता आहे. गडबड असल्यानेच कारवाई होत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर कायमस्वरूपी तोडगा हवा

मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच आहे. मात्र ते आरक्षण कायमस्वरूपी हवे. गतवेळी देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रयत्न केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने काहीच प्रयत्न केले नाही. त्यामुळे ते आरक्षण टिकले नाही. आता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता आमचे सरकार घेत आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल पण आरक्षण सर्वच पातळ्यांवर टिकले पाहिजे, असा आमच्या सरकारचा आग्रह असल्याचे महाजन म्हणाले.

Girish Mahajan Vs Jitendra Awhad
Devendra Fadnavis : राम मंदिर सोहळ्यामुळे काहींना पोटशूळ; फडणवीसांनी लगावला टोला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी शिर्डी येथे पक्षाच्या मेळाव्यात भाषण करताना, प्रभू श्रीरामाच्या आहाराबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांसह सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाय, राजकीय नेत्यांसह मंत्र्यांचीही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com